सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या

नवी दिल्ली : आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्यावा, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रतेच्या सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहतांनी युक्तीवाद केला आहे. तुषार मेहतांनी वेळ वाढवून मागितील होती. पण सर्वोच्च न्यायालयाने वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे.

विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नसल्यामुळे सरन्याधीशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून विधानसभा अध्यक्षांना वेळोवेळी संधी देऊ सुधा ठोस तारीख देण्यात आली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत म्हटले आहे. या सुनावणीपूर्वी विधानसभा अध्यक्षांकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार 29 फेब्रुवारी 2024पर्यंतचा वेळ मागितला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना वेळ देण्यास नकार दिलेला आहे. तुषार मेहता यांनी वेळ वाढवून मागितला होता. या मागणीला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार विरोध केला होता. यामुळे आता येत्या 31 डिसेंबरपर्यंत विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे.

अजित पवार आमदारांचा देखील निर्णय घ्या

तसेच अजित पवार आणि इतर आमदारांचा निर्णय 31 जानेवारीपर्यंत घ्यावा. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर इतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यत घ्यावा, असेही निर्देश सरन्यायाधीशांनी दिले आहे. तुषार मेहतांनी युक्तीवाद करताना दिवाळीच्या सुट्टी आणि हिवाळी अधिवेशन मुद्दा मांडला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाअजित पवार यांच्याबाबतची ३१ जानेवारी ही मुदत दिली आहे.

यापूर्वी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावले

यापूर्वी देखील सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना खडेबोल सुनावले होते. आमदार अपात्रतेसंदर्भात मे महिन्यात निर्णय दिला आहे. पण अद्यापही विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेतलेला नाही. यावरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आता विधानसभा अध्यक्ष काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट