मध्य रेल्वेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा; यशस्वी महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सिडकोमध्ये महिला दिन उत्साहात साजरा मेनोपॉजचा त्रास सहन करत बसू नका, सखी तुमच्यासोबत आहे . न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

होळीनिमित्त वृक्षतोड केली तर दाखल होणार गुन्हा

 : होळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. रविवारी होळी असल्याने नागरिकांना वृक्षतोड न करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. कुणीही बेकायदा वृक्षतोड करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबत पोलिस तक्रार करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.  

तसेच होळीच्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास पालिका अधिकारी आणि स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. महापालिकेच्या १९१६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले. 

‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’नुसार कलम २१ अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे हा अपराध आहे. 

वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.

रिपोर्टर

  • ROHAN RASAL
    ROHAN RASAL (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    ROHAN RASAL

संबंधित पोस्ट