सध्या अवकाली पावसाने थैमान घातले असून अनेक जण या अवकाली पावसाने हैराण झाले असता हा अवकाळी पाऊस अनेकांना डोकेदुखी ठरवू लागला असून अनेक रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने काही रस्त्यांवर डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, त्यातच खोपोली नगरपालिका हद्दीतील शेडवली - चिंचवली मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडल्याने याठिकाणी अवकाळी पावसामुळे रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिक व वाहन चालक संताप व्यक्त असून या खड्ड्यातून प्रवास करणे अनेकांना त्रासदायक ठरू लागल्याने प्रवासी व वाहन चालक नगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत.
खोपोली नगरपालिकेचा कारभार प्रशासक म्हणून मुख्याधिकारी त्यांच्या देखरेखी खाली सुरू असल्याने शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी वापरत खोपोली नगरपालिका हद्दीतील काही रस्ते चकाचक करण्यात आले, त्यामुळे खोपोली शहरातील बहुतांश प्रभागातील खड्डेमुक्त झाल्याने त्या - त्या परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत असेल तरी काही प्रभागाकडे दुर्लक्ष झाल्याने काही रस्ते खड्ड्यांच्या विळख्यात सापडल्याचे पहावयास मिळत आहे, त्यामुळे अनेक जण संताप व्यक्त करत आहेत.
नगरपालिका हद्दीतील चिंचवली शेडवली परिसर गेल्या काही वर्षापासून झपाट्याने विकसन होत असल्याने याठिकाणी नागरिकांची व या परिसरात नव्याने घर घेऊ पाहणाऱ्या बाहेरील व्यक्तींची मोठी गर्दी दररोज पाहायला मिळत असून चिंचवली शेडवली रस्ता नियमित वर्दळीचा बनला असला तरी या रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे अनेकांना त्रासदायक ठरू लागले आहेत. हा रस्ता गेल्या काही महिन्यापासून खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असता अवकाली पावसाने केलेल्या दमदार एंट्रीने या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, त्यामुळे येथील नागरिक व बाहेरील गावावरून येणारे व्यक्ती, वाहन चालक नगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत असून लवकरात लवकर हे खड्डे न भरल्यास पावसाळ्यात या रस्त्यावरून डब्याच्या रस्त्यातून प्रवास करावा लागणार हे मात्र निश्चित. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत हा मार्ग लवकरात लवकर खड्डे मुक्त करा अशी मागणी येथील नागरिक, प्रवासी व वाहन चालक करत आहेत.
चौकट -
मे महिन्यातच अवकाली पावसाने दमदार एन्ट्री मारत अनेकांची तारांबळ उडवली असता या अवकाली पावसाने चिंचवली - शेडवली रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहेत. तर डबक्याचे स्वरूप प्राप्त झालेल्या मोठ्या खड्ड्यातून प्रवास करणे वाहन चालकांना व प्रवासांना त्रासदायक ठरू लागल्याने याठिकाणी दररोज लहान-मोठे अपघात घडत असून या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात याठिकाणी मोठी दुर्घटना घडवून काहींना इजा पोहचू शकते. तर मुख्य रहदारीच्या रस्त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक जण संताप व्यक्त करत असून नगरपालिका प्रशासनाने याचे गांभीर्य घेत रस्ता खड्डे मुक्त करावा जेणेकरून सर्वांचा प्रवास सुखकर होईल. जर त्याचे गांभीर्य न घेतल्यास होणाऱ्या दुर्घटनेला नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील.
रिपोर्टर
The Global Times
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times