वाशीत सी 1 कॅटेगरीतील 3 अतिधोकादायक इमारतींचा पाणी, विद्युत पुरवठा व मलनि:स्सारण वाहिनी खंडीत
नवी मुंबई महानगरपालिका सी विभाग वाशी कार्यक्षेत्रातील सी-1 (अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्काषित करणे) या प्रवर्गात घोषित करण्यात आलेल्या इमारतींचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आदेशान्वये व उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यांची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने वाशी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री. सुखदेव येडवे यांच्या नियंत्रणाखाली 3 अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा व मलनि:स्सारण वाहिनी खंडीत करण्यात आलेली आहे.
या इमारतींमध्ये –
(1) जय महाराष्ट्र सोसा., जे एन-2 टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, भु.क्र.4, से-09, वाशी
(2) लिटिल फ्लॉवर को.ऑप.हौ.सो. लि., जेएन-4 टाईप (बिल्डिंग नं. 9) से.9, वाशी.
(3) सी 1 व सी 2 टाईप, बिल्डींग नं-1 ते 12, सेक्टर-02, वाशी.
- या 3 इमारतींचा समावेश आहे.
या धडक मोहिमेसाठी वाशी विभाग कार्यालयातील पाणी पुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग व मलनि:स्सारण विभाग यांचे अधिकारी/कर्मचारी, स्थानिक पोलिस स्टेशनचे कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
सध्या पावसाळा सुरु झाला असून नमुंमपा कार्यक्षेत्रातील इतर अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवास करणा-या नागरिकांनी रहिवास वापर थांबवून इमारत खाली करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. यापुढील काळात अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times