सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

९ व्या श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्ट राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे उदघाट्न दिमाखात

९ व्या श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्ट राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे उदघाट्न दिमाखात

श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे कै.अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्ट राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे उदघाटन सकाळी दिमाखात पार पडले. श्री. दिगंबर शंकर पुजारी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नरसोबावाडीचे नूतन सरपंच श्री.चेतन चंद्रकांत गवळी यांनी भूषविले. या प्रसंगी दत्तराज चारीटेबल ट्रस्ट चे चेअरमन श्री. हर्षद अशोक पुजारी आणि इतर संचालक मंडळी उपस्थीत होते. खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्यांनी नवोदित खेळाडूंना अशा स्पर्धांच्या आयोजनाचे आश्वासन दिले आणि आपल्या पूज्य वडिलांचे कार्य असेच उत्तमरित्या चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या ठिकाणी महाराष्ट्र कॅरम संघटनेचे मानद सचिव श्री. अरुण केदार आणि खजिनदार अजित सावंत उपस्थित होते. तसेच कोल्हापूर कॅरम संघटनेचे सचिव विजय जाधव व कार्यकारणी सदस्य श्री. भालचंद्र पुजारी या प्रसंगी उपस्थित होते. या सामान्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचे संपूर्ण वृत्तांकन दूरदर्शन करणार आहे. या स्पर्धेमध्ये तीन विश्वविजेते खेळाडू व जवळपास ३५ आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू खेळत असल्यामुळे कोल्हापूरच्या कॅरम रसिकांसाठी जणू हि मेजवानीच आहे. 

रिपोर्टर

  • Suhas Kamble
    Suhas Kamble (sub editor)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Suhas Kamble

संबंधित पोस्ट