भारतात रंगणार वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशीप स्क्वाॅश स्पर्धा
- by
- Jul 23, 2026
भारतात रंगणार वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशीप स्क्वाॅश स्पर्धा
सोमैय्या विद्याविहार विद्यापीठाला यजमानपद
३ ते ९ ऑगस्ट दरम्यान मुंबईत १४ देशांतील विद्यार्थी-खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार
मुंबई : भारतात वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशीप स्क्वाॅश स्पर्धा रंगणार आहे. सोमैय्या विद्याविहार विद्यापीठात ‘2026 FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप स्क्वॉश’चे यजमानपद भूषवणार आहे. या स्पर्धेमुळे जगभरातील विद्यार्थी-खेळाडू एका आठवड्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय भूमीवर एकत्र येणार आहेत. ‘इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स फेडरेशन’ (FISU) च्या मार्गदर्शनाखाली आणि ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ (AIU) च्या सहकार्याने आयोजित या चॅम्पियनशिपचे ब्रीदवाक्य “Smashing Barriers, Uniting Nations” (अडथळे दूर करणे, राष्ट्रांना एकत्र आणणे) असे आहे. लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये स्क्वॉशचा ऐतिहासिक समावेश होणार असताना, या खेळासाठी ही स्पर्धा एका महत्त्वपूर्ण वळणावर आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा 3 ते 9 आॅगस्ट दरम्यान होणार आहे. याचे उद्घाटन २ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे.
२०२६ च्या FISU WUC (वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप) मध्ये सिंगापूर, हाँगकाँग, झेक प्रजासत्ताक, फ्रान्स, स्पेन, हंगेरी, न्यूझीलंड, युनायटेड िकंगडम, िस्वत्झर्लंड, पोलंड, दक्षिण आफ्रिका, चीन हे देश सहभागी होणार आहेत. भारतातर्फे सुरज चंद, ओम सेमवाल, निरुपमा दुबे हे खेळणार आहेत. तसेच या स्पर्धेची यजमानपदाची जबाबदारी सोमैय्या िवद्याविहार विद्यापीठकडे सोपविण्यात आली आहे.
‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’च्या (AIU) सरचिटणीस डॉ. (श्रीमती) पंकज मित्तल म्हणाल्या: “’इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स फेडरेशन’च्या (FISU) सहकार्याने ‘सोमैय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, मुंबई’ आयोजित करत असलेल्या ‘FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२६’ला पाठिंबा देताना ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ला अभिमान वाटत आहे.
सरचिटणीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथियास रेमुंड म्हणाले, “FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप स्क्वॅश पुन्हा भारतात येत असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. मला खात्री आहे की ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ आणि ‘सोमैय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी’ एक आकर्षक, अद्वितीय आणि अविस्मरणीय स्पर्धा आयोजित करतील, जी भारत आणि त्यापलीकडे विद्यापीठीय क्रीडा चळवळीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल.”
सोमैय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीचे कुलपती समीर सोमैय्या म्हणाले, “कॉर्नेलमध्ये विद्यार्थी असताना स्क्वॅश खेळत असल्यापासूनच माझा असा विश्वास आहे की जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा हा विद्यापीठीय परिसंस्थेचा (ecosystem) अविभाज्य भाग असायला हवा. मुंबईत FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपचे आयोजन करणे हा त्या दृष्टीकोनाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
सोमैय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीचे कुलगुरू ( प्रा. अजय कपूर यांनीही या भावनांना दुजोरा दिला. ते म्हणाले, “आम्हाला अभिमान वाटतो की ‘इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स फेडरेशन’ (FISU) आणि ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ (AIU) यांनी २०२६ च्या FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप स्क्वॅशचे आयोजन आणि यजमानपद सोमैय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीकडे सोपवले आहे. ही चॅम्पियनशिप म्हणजे उत्कृष्टता, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासाठी विद्यापीठीय खेळांना एक व्यासपीठ म्हणून पुढे नेण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे फळ आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble