श्री दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट चिंचवली गोरेगांव या ट्रस्टच्या विश्वस्तांची सभा नुकतीच संपन्न झाली सदरहू सभेमध्ये कुणबी समाजातील लोणेरे-गोरेगांव बत्तीशी विभागातील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण संपादीत केलेल्या गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सालाबादप्रमाणे याही वर्षी करण्याचे ठरविलेले आहे. सदरहू गुणगौरव सोहळा बुध्दविहार गोरेगांव येथे रविवार दिनांक २२/६/२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता नामदार मंत्री भरतशेट गोगावले, रोजगार हमी, फलोत्पादन व खारभुमि विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते व श्री दत्तात्रेय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश टेंबे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
गेली अनेक वर्षे या ट्रस्टतर्फे या भागातील विदयार्थ्यांचा गुणगौरव केला जातो. गुणवंत विदयार्थ्यांना शाबासकी देऊन त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले जाते तसेच पुढील शिक्षणाकरीता मार्गदर्शन केले जाते. दि.२२/६/२०२५ रोजी मार्गदर्शन करणेकरीता मा.डॉ. सचिन पोरे, प्रोफेसर, हेड ऑफ डिपार्टमेंट सिव्हील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ लोणेरे यांचे बहुमोल मार्गदर्शन विदयार्थ्यांना लाभणार आहे.
या विभागातील कुणबी समाजातील विदयार्थ्यांनी या विभागातील हायस्कुल व्यतिरिक्त शिक्षण घेऊन यश संपादन केले असेल अशा विदयार्थ्यांनी तसेच सन २०२४ मध्ये या बत्तीशी विभागातील जे विदयार्थी डीप्लोमा व डीग्री उत्तीर्ण झाले आहेत अशा विदयार्थ्यांनी पंढरी शेडगे सेक्रेटरी मो.नं.८०८७४६९४८४ यांचेकडे संपर्क साधावा. जेणेकरून त्या विदयार्थ्यांचा सत्कार करता येईल असे आवाहन श्री दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट कडून करण्यांत येत आहे.या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Global Times
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times