Lemon Chicken Recipe by our own “Ronit Suryarao”. in both English and Marathi.
- Jun 17, 2025
- 137 views
मुंबई, १७जून २०२५, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि चविष्ट बुफे प्रकारांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या रेस्टॉरंट साखळी बार्बिक्यू नेशन तर्फे ‘कुक्कड़ कार्निवल - चिकन फेस्टिव्हल’ सुरू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील खाद्यप्रेमी १० जून ते १० जुलै दरम्यान आपल्या जवळच्या बार्बिक्यू नेशन रेस्टॉरंटमध्ये या खास चिकन फेस्टिव्हलचा आस्वाद घेऊ शकतील!
बार्बिक्यू नेशन ही भारतातील आघाडीची रेस्टॉरंट साखळी असून तिचे लाइव्ह ग्रिल्स आणि विविध प्रकारचे बुफे यासाठी ती ओळखली जाते. ‘कुक्कड़ कार्निवल’च्या माध्यमातून, ग्राहकांना एक अनोखा आणि संस्मरणीय डायनिंग अनुभव देण्याचा उद्देश आहे.
या फेस्टिव्हलमध्ये अनेक खास आणि तोंडाला पाणी सुटेल अशा डिशेसचा समावेश आहे जसे की: चिकन मरग सूप, स्टार्टर्समध्ये – भुना रसीला कुक्कड़, चिकन कीमा समोसा, चिकन कीमा पाव, हरा मसाला तवा चिकन, स्टफ्ड चिकन चीज टिक्की, क्रिस्पी चिकन स्ट्रिप्स, चिल्ली स्वीट चिकन विंग्स. मेन कोर्समध्ये – चिकन हलीम, दम का मुर्ग, मुर्ग चंगेजी, आणि तंदूरी घी रोस्ट चिकन बिर्याणी. गोडीने शेवट करण्यासाठी डिजर्ट्समध्ये आहेत.
मिठ्या बुंदी आणि रबडीचा संगम असलेला बेक्ड माही, पिस्ता व ड्रायफ्रूट्सने भरलेली फिरनी, आणि पान, चॉकलेट व मँगो फ्लेवर्समध्ये कुल्फी.
शाकीर अली, वेस्ट रीजनल मॅनेजर, बार्बिक्यू नेशन म्हणाले: "आम्ही आमच्या प्रत्येक फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना एक विशेष अनुभव देण्याचा प्रयत्न करतो आणि ‘कुक्कड़ कार्निवल’ हे खास नॉनव्हेज फूड लव्हर्ससाठी आमचे खास भेट आहे. यात आमच्या सिग्नेचर डिशेस आणि नवकल्पना ग्राहकांच्या पसंतीनुसार सादर करण्यात आल्या आहेत."
बार्बिक्यू नेशनची खास ओळख असलेल्या थीम डेकोर, अॅम्बियन्स आणि युनिफॉर्ममध्ये सजलेल्या स्टाफद्वारे ग्राहकांना एक परिपूर्ण थीम-आधारित अनुभव दिला जाणार आहे. १० जून ते १० जुलै दरम्यान या चविष्ट फेस्टिव्हलचा अनुभव घेण्यासाठी आपल्या जवळच्या बार्बिक्यू नेशनमध्ये जरूर भेट द्या!
राहुल अग्रवाल, सीईओ, बार्बिक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी लिमिटेड म्हणाले:"या फेस्टिव्हलच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रिय ग्राहकांना एक फ्रेश आणि युनिक डायनिंग अनुभव देऊ इच्छितो."
भारतात “Do It Yourself” अर्थात स्वतः ग्रिल करून खाण्याच्या कॉन्सेप्टचा पायोनियर असलेले बार्बिक्यू नेशनचं पहिले रेस्टॉरंट २००६ साली मुंबईत सुरू झाले. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने, आज ८० पेक्षा अधिक शहरांमध्ये १९० पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स स्थापन करून, बार्बिक्यू नेशनने अन्न क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला आहे. या प्रवासात ब्रँडने इंटरअॅक्टिव्ह लाइव्ह काउंटर, स्वादिष्ट कुल्फी आणि ‘बार्बिक्यू इन अ बॉक्स’ यासारखे यशस्वी संकल्पना सादर केल्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times