कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात 18-19 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ, नदी-नाल्यांना पूर, आणि दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई, दि 17: मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, उर्वरित मुंबई महानगर; सोलापूर, धाराशिव, आणि लातूर जिल्ह्यांचा काही भाग यांचा समावेश आहे. या दरम्यान खान्देश आणि उर्वरित मराठवाड्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तुलनेत विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. या दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तसेच काही प्रमाणात दरड कोसळणे, आणि सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
Tejal KhanvilkarWith an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.