मंत्री अदिती तटकरे यांची स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेला भेट
- by
- Nov 05, 2026
मंत्री अदिती तटकरे यांची स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेला भेट
विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती घेत; फाउंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमांचे केले कौतुक
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबईतील दादर येथील भवानी शंकर CBSE म्युनिसिपल पब्लिक स्कूलमधील स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेला (Digital Literacy Lab) भेट दिली. यावेळी युवा नेते सुषांत जी. जबरे हे देखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांनी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.भेटीदरम्यान अदिती तटकरे यांनी अंश, नील आणि आरुष या विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केलेली ॲप्लिकेशन्स त्यांना दाखवली. या ॲप्लिकेशन्समागील संकल्पना आणि ती विकसित करण्यासाठी वापरलेल्या प्रक्रियेविषयी त्यांनी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतले. तसेच, अक्षरा या विद्यार्थिनीशी तिच्या प्रकल्पाबाबत संवाद साधत विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कामाचे आणि शिकण्याच्या अनुभवाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
स्नेह आशा फाउंडेशनच्या संस्थापिका सिद्धी चौहान जयस्वाल आणि फाउंडेशनच्या सी. एस.आर. व नियोजन विभागाच्या प्रमुख मधुमिता प्रसाद यांनी अदिती तटकरे यांना फाउंडेशनचे ध्येय, उद्दिष्टे आणि तीन प्रमुख उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये डिजिटल साक्षरता, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि जीवन कौशल्य विकास या उपक्रमांचा समावेश आहे.
स्नेह आशा फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी यावेळी डिजिटल साक्षरता उपक्रमाची कार्यपद्धती विशद केली. या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र संगणक उपलब्ध करून देत प्रत्यक्ष संगणक प्रशिक्षणावर भर दिला जातो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दर आठवड्याला प्रत्येकी एक तासाची दोन प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातात. सध्या मुंबईतील १४ आणि ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) अंतर्गत येणाऱ्या एका शाळेसह एकूण १५ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे देण्यात आली. यामध्ये पालघर येथे राबविण्यात येणाऱ्या जीवन कौशल्य विकास उपक्रमाचा समावेश होता. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवन कौशल्ये, आर्थिक साक्षरता, दैनंदिन व्यवहारांसाठी आवश्यक इंग्रजी भाषा आणि करिअरविषयक तयारीचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच, शैक्षणिक शिष्यवृत्ती उपक्रम आणि त्याचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथांची माहितीही यावेळी देण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय जलतरण स्पर्धेच्या तयारीत असलेल्या दृष्टिहीन जलतरणपटू सिद्धी दळवी हिच्या उल्लेखनीय प्रवासाची माहितीही अधोरेखित करण्यात आली. याशिवाय, मुंबई महानगर प्रदेश (MMR), पालघर, गडचिरोली आणि नंदुरबार या भागांमध्ये बालपणातील संगोपन व शिक्षण (Early Childhood Care and Education – ECCE) या क्षेत्रात उपक्रमांचा विस्तार करण्यासंदर्भातील फाउंडेशनच्या भविष्यातील योजनांचीही माहिती देण्यात आली.फाउंडेशनच्या उपक्रमांबाबत आपला अभिप्राय व्यक्त करताना मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले की 'आज स्नेहआशाने उभारलेल्या संगणक प्रयोगशाळेला भेट देऊन अतिशय आनंद झाला. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची आणि त्यांचा उत्साह अनुभवण्याची संधी मिळाली. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”
त्याच प्रमाणे या भेटीदरम्यान स्नेह आशा फाउंडेशनच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरणही यावेळी पाहण्यात आले.
स्नेह आशा फाउंडेशनविषयी
सिद्धी जैस्वाल आणि स्नेहा जैस्वाल यांनी स्थापन केलेली स्नेह आशा फाउंडेशन ही मुंबईस्थित ना-नफा तत्त्वावर कार्य करणारी संस्था आहे. डिजिटल शिक्षण, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून वंचित घटकांतील मुलांसाठी शैक्षणिक संधींचा विस्तार करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.
जनसंपर्क विभाग
स्नेह आशा फाउंडेशन
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times