शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना १००व्या जयंतीनिमित्त पनवेल शिवसेना शाखेने केले अभिवादन ,एटीएमची अदलाबदल करून ५२ हजारांची फसवणूक, दोन लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल,दोन लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल.
पनवेल दि. २३ (वार्ताहर) : हिंदुहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या १००व्या जयंतीनिमित्त पनवेल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेने अभिवादन केले.
यावेळी शहर प्रमुख प्रविण जाधव, महिला संघटिका उज्वला गावडे, विभाग संघटिका अश्विनी देसाई, प्रशांत नरसाळे, जुनैद पवार, निखिल भगत, भास्कर पाटील, कुणाल कुरघोडे, प्रदीप माखीजा, मयुरेश पाटील, आदिल आवसेकर, राजेश शेट्टीगार, बापू जोशी, नूर वाईकर, सचिन कदम आदी उपस्थित होते.
एटीएमची अदलाबदल करून ५२ हजारांची फसवणूक
पनवेल दि. २३ (वार्ताहर) : एटीएम कार्डची अदलाबदली करून ५२ हजार २२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
साधना बोहरा या तक्का गाव येथे राहत असून त्या रोख रक्कम काढण्यासाठी घरातून पायी निघाल्या. त्या रेल्वे स्टेशन जवळील एटीएम मध्ये गेल्या, पैसे काढण्यासाठी एटीएम टाकला असता दोन अनोळखी ईसम आले आणि एटीएम खराब आहे
असे बोलून त्यांनी एटीएम कार्ड हातातून घेतले. आणि नकळत एटीएम कार्डची अदलाबदली करून त्याच्याजवळील एटीएम कार्ड बोहरा यांना दिले. आणि तेथून तो निघून गेला. त्यानंतर त्यांनी ओळखीच्या व्यक्तीला एटीएम देऊन पैसे काढण्यास सांगितले, मात्र एटीएममधून पैसे आले नाहीत. या वेळी त्यांच्या मोबाईल नंबर वर पैसे विड्रॉल झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर बँकेत जाऊन त्यांनी स्टेटमेंट काढून पाहिले असता ५२ हजार २२ रुपये विधड्रॉल झाल्याचे दिसून आले.
दोन लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
पनवेल दि. २३ (वार्ताहर) : जुन्या मशीन पावडर कोटिंग करून देतो असे सांगून दोन लाख ३४ हजार रुपये रोखीने आणि ऑनलाईन स्वीकारून नवीन आणि कोटिंग केलेल्या मशीन न देता फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी प्रशोध पाणीकर आणि यामिनी पाणीकर (रा. एनआरआय कॉम्प्लेक्स, सिवूड) यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्ताफ पठाण हे खारघर सेक्टर ४० येथे राहत असून ते नवीन जिमच्या साहित्याच्या शोधात होते. प्रशोध पाणीकर यांच्यावर त्यांनी फोनवर बोलणे केले. यावेळी जुन्या पंधरा मशीनपैकी सात मशीन बदलून नवीन देणार आणि उर्वरित आठ मशीन पावडर कोटिंग करून देणार असल्याचे ठरले. या वेळी बिग बॉय फिटनेस नावाची कंपनी असल्याचे खोटे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला आणि दोन लाख ३४ हजार ४०० रुपये रोखीने आणि ऑनलाईन स्वीकारले, मात्र नवीन मशीन तसेच पावडर कोटिंग केलेल्या मशीन न देता फसवणूक केली.
मुलाच्या गळ्यातील सोने चोरले
पनवेल दि. २३ (वार्ताहर) : पनवेल पाच वर्षीय मुलगा खेळत असतानात्याच्या गळ्यातील काळा धागा कापून सोन्याचे पान चोरून नेल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनील डोंबाळे हे कळंबोली, सेक्टर एक येथे राहत असून त्यांचा पाच वर्षीय मुलगा हा घरासमोर गल्लीत खेळत होता. या वेळी अनोळखी व्यक्तीने त्याच्या गळ्यातील काळा धागा कापला आणि त्यातील साडेचार हजार रुपयांचे सोन्याचे पान चोरून नेले.
महिला बेपत्ता
पनवेल दि. २३ (वार्ताहर) : नेरे येथील शिल आश्रम येथून आश्रमातील कर्मचा-यांची नजर चुकवून एक ५० वर्षीय मनोरुग्ण महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
सारा असे या महिलेचे नाव असून (वय ५०) ती अंगाने मजबूत, उंची ५ फुट, केस काळे, पुरुषासारखे कापलेले, डोळे काळे, रंगाने सावळी, चेहऱ्यावर डावे बाजुला गालावर गोलाकार केस आलेले, अगात पिवळ्या रंगाचा गाउन, डोक्यावर कपडा बांधलेला आहे. सदर महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार अमर भालसिंग यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो : बेपत्ता महिला
भरधाव रिक्षाची कंटेनरला धडक; दोघांचा मृत्यू
पनवेल दि. २३ (संजय कदम) : मुंबई गोवा महामार्गावर पनवेल कडुन पेणकडे जाणा-या दिशेने रोडवर विठठल कामत हॉटेलजवळ चिंचवण गांव रस्त्याचे मध्ये भरधाव जाणाऱ्या रिक्षाने रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या धडकेत २ मुंब्रा येथील दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर चिंचवण गांव जवळ कंटेनर (एमएच ४६ बीएम ३४५५) वरील चालक याने रात्रीच्या सुमारास त्याचे ताब्यातील रस्त्याचे मध्ये वाहतुकीस अडथळा होईल असे लावले होते. यादरम्यान येणाऱ्या रिक्षाने या कंटेनरला धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक रफिक अन्सारी(वय ४०), फातीमा अन्सारी (वय २०) यांचा जागीच मृत्यू झाला तर शहनाज अन्सारी (वय ४०), सुमया अन्सारी (वय ०९) हे गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मोटारसायकलची चोरी
पनवेल दि. २३ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्थानकाचे बाहेर रेल्वेमेंन्टनेन्स डेपोच्या जवळ मोकळया जागेत पार्क करून ठेवलेली रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
साईनगर येथील प्रणव पवार यांनी त्यांची एक लाख रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटारसायकल पनवेल रेल्वे स्थानकाचे बाहेर रेल्वेमेंन्टनेन्स डेपोच्या जवळ मोकळया जागेत पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती मोटारसायकल चोरून नेली. याबाबत प्रणव पवार यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीच्या आवारातून अल्युमिनियम प्लेटची चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात
पनवेल दि. २३ (संजय कदम) : पनवेल परिसरात कंपनीच्या आवारातून अल्युमिनियम प्लेटची चोरी करणाऱ्याला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथील मॅराथॉन रियालीटी प्रा. लि कपंनीच्या आवारात असलेली १० हजार रुपये किमतीची ८ अल्युमिनियम प्लेटची चोरी झाल्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून आरोपी शंकर कातकरी (वय २५) याला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पनवेल प्रभाग क्रं १९ मध्ये नामफलकाचे अनावरण
पनवेल दि. २३ (वार्ताहर) : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रं १९ मध्ये नामफलकाचे उदघाटन शिवसेना पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या हस्ते जुने तहसील कार्यालय येथे करण्यात आले. या सामाजिक उपक्रमासाठी उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांनी पुढाकार घेतला.
पूर्वी शिवसेनेच्या फलक संस्कृतीच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक समस्या मांडण्याचे काम होत असे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना त्या-त्या प्रभागातील समस्या कळत असत, अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम हे फलक संस्कृती द्वारे होत असे, तसेच नागरिकांना आपल्या विभागातील माहिती देणाचे काम हे फलकाद्वारे होत असे. बाळासाहेबांची शिकवण म्हणजे ८०% समाजकारण व २०% राजकारण या धोरणानुसार उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांनी अनेक दिवसांच्या प्रयत्नाने नामफलकाचे अनावरण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने करून घेतले आहे. नागरिकांच्या समस्या, सामाजिक कार्यक्रम, लोकहिताच्या बातम्या, प्रभागातील उत्सव, त्याचप्रमाणे लेखणीच्या माध्यमातून फलकाद्वारे लोकहीत साधण्याचे उत्तम काम या प्रभागात होणार आहे. या उदघाटन प्रसंगी बोलताना प्रथमेश सोमण यांनी सांगितले की प्रत्येक विभागात असे भविष्यात आम्ही नामफलक लावणार असून,जनतेचा आवाज बुलंद करून त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम पनवेल महानगरपालिका प्रभागात आम्ही करणार आहोत.
आमच्या सामाजिक कार्याच्या जोरावर भविष्यात आम्ही अनेकांचे शिवसेनेत पक्ष प्रवेश करून घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले. नामफलकाच्या उदघाटन प्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे,शहरप्रमुख प्रसाद सोनवणे,अभिजित साखरे, मंदार काणे, खंडेश धनावडे, सिद्देश खानविलकर,विक्रम पाटणकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचा महायुतीला पाठिंबा; आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले पाठिंबाचे पत्र
पनवेल दि. २३ (संजय कदम) :स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आगामी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना पक्षाच्या वतीने महायुतीला पाठिंबाचे पत्र केले. त्यावेळी त्यांच्यासोबत पनवेल शहर अध्यक्ष प्रशांत सोनवणे उपस्थित होते.
त्याचबरोबर आगामी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व तालुका अध्यक्षांची बैठक माणगाव येथे माणगाव तालुका अध्यक्ष नितेश हाटे यांच्या कार्यालयात दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित केलेली आहे या बैठकीला पनवेल तालुका अध्यक्ष दिलीप नाईक, पेण तालुका अध्यक्ष अमित कांबळे ,श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सुयोग लोखंडे, महाड तालुका अध्यक्ष सुजीत जाधव त्याचप्रमाणे रायगड जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी व विविध सेलचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचे काम करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
Tejal KhanvilkarWith an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.