न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी ..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात

ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील 1857 च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव विख्यात आहे. झाशी ची राणी’ अशी ओळख असणार्‍या या रणरागिणीच्या जीवनचरित्रावर ‘स्वोर्डस अँँड सेपटर्स’ नावाचा आंतरराष्ट्रीय सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरल्या गेलेल्या या ज्वलंत घटनेची दखल या सिनेमाद्वारे जागतिक पातळीवर घेतली जाणार आहे.  भारतीय कलाशास्त्रज्ञ, प्रोफेसर, आणि भरतनाट्यम विशारद असलेल्या स्वाती भिसे यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसेने यात राणी लक्ष्मीबाईची प्रमुख भूमिका साकारली असून, या आंतरराष्ट्रीय चित्रपटात अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले, सिया पाटील आणि पल्लवी पाटील या मराठी चेहर्‍यांचा वावरदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. राणी लक्ष्मीबाईची यशोगाथा जगाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात लवकरच पोहोचवणार्‍या या सिनेमाचा नुकताच तडफदार पोस्टर लाँँच करण्यात आला. 

स्वोर्डस अँँड सेपटर्स’ हा हॉलीवूड सिनेमा जरी असला, तरी या सिनेमाचा विषय भारतातल्या ऐतिहासिक घटनेवर आधारित असल्यामुळे, या सिनेमाच्या पोस्टरवर भारतीय संस्कृतीचा मुलामा चढलेला आपल्याला दिसून येतो. 1857 च्या उठावाची क्रांतीज्योत पेटवणार्‍या राणी लक्ष्मीबाईचे तेजस्वी रूप यात आपल्याला दिसून येते. हा सिनेमा इंग्रजी भाषेमध्ये जरी असला तरी, यात थोड्याफार प्रमाणात मराठी आणि हिंदी भाषेचादेखील वापर करण्यात आला आहे. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट