"थलपती विजय यांचा ऐतिहासिक शपथविधी; राहुल गांधी उपस्थित"
थलपतींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
राहुल गांधीही उपस्थित
नवी दिल्ली: अभिनेता जोसेफ विजय यांनी रविवारी तामिळनाडुचे मुख्यमंत्री म्हणून रामध घेतली. अखेर पाच दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर आज तमिळनाडूत शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल विश्वनाथ अनेकर यांनी विजय यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी २ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला या शपथविधी सोहळ्यासाठी कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
५ दिवसांनी सुटला सत्तास्थापनेचा तिढा
जोसेफ विजयने सीएमओ कार्यालयात जाऊन पदभारही स्वीकारला तामिळनाडूत विजय यांच्या टीव्हीके पक्षाला १०७ जागा मिळाल्या. मात्र सत्तास्थापनेसाठी आणखी १९ आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांच्या नाकीनऊ आले होते. सुरुवातीला कॉँग्रेसच्या ५ आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. मात्र आणखी ६ आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेल ३ दिवस लागले. शनिवार संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या ११६ पर्यंत पोहोचली. तरीही दोन आमदारांचं संख्याबळ कमी असल्यानं सत्तास्थापनेचा पेच सुटला नव्हता अखेर व्हीसीकेच्या दोन आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या दोघांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने टीव्हीकेचे संख्याबळ १२० वर पोहोचले आणि सत्तास्थापनेचा तिढा सुटला.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times