ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

नालायकाला तिकीट दिले नसते तर गद्दारीची कीड वाढली नसती : उद्धव ठाकरे


धाराशिव : शिवसेनेतून बंड करून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवले.

फुटीर खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चा होते आहे ती ओमराजे निंबाळकर यांची. उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवला जाऊन तेथील मतदारांची माफी मागितली. या नालायकाला तिकीट दिले नसते तर गद्दारीची कीड वाढली नसती, असे ठाकरे म्हणाले. तसेच गद्दारांवर आगपाखड करणारा ओमराजे स्वतःचा भाव वाढवून अखेरच्या क्षणी विकला, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे सभा घेत आहे. आज त्यांनी धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सभा घेतली. सहा खासदार सोडून गेले पण त्यांना सर्वाधिक दुःख ओमराजे निंबाळकर यांच्या सोडून जाण्याचे झाल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवले, ओमला मी शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न केला पण तो अखेरच्या क्षणी विकला गेला. तो माणूस म्हणायच्या देखील लायकीचा नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

हरामाचा पैसा हवा होता म्हणून गद्दार तिकडे गेला. त्याला उमेदवारी दिली याची मला लाज वाटते. शिवसैनिकांनी मला माफ करावं. ओमराजेला उमेदवारी दिली नसती तर गद्दारीची कीड वाढली नसती. सरकारला भ्रष्टाचारात मदत करायला हा गद्दार तिकडे गेला. ओमराजे, आता कपाळावरील गहारीचा शिक्का कसा पुसणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला,

तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली....

बैठकीत ओमचा चेहरा साफ नव्हता, त्याचवेळी मनात शंकेची पाल चुकचुकली. ओमराजेचा व्हिडीओ पाहिला आणि त्याला फोन केला, तुझ्यावर काही दबाव आहे का, तणाव आहे का? त्यावर तो म्हणे, नाही अजिबात दबाव-तणाव नाही. पण माझ्या मनात तेव्हाच शंका आली, म्हटलं याचा चेहरा साफ दिसत नाही. ओमला मी शेवटपर्यंत जपायचा प्रयत्न केला. वरूण सरदेसाई आणि कैलास पाटील यांना भेटायला त्याला पाठवलं. मला ओमराजे पाहिजे, त्यांना खासदार पाहिजे, असे मी ओमराजेला म्हटले. पण आता लक्षात येतंय हा माणूस म्हणायचा देखील लायकीचा नाही, याच्या एवढ्या भानगडी आहेत. पाच जणांचं आधीच ठरलेले, ओमराजे शेवटपर्यंत अडून बसले, भाव वाढवून घेतला, असे शाब्दिक हल्ले उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंवर चढवले. आता गद्दारीला माफी नाही. कितीही गद्दारी करा, तुमच्या छाताडावर भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही. मला धाराशिवची चिंता नाही. इथे आमदारही आपलेच आणि पुढचा खासदारही आपलाच येणार हे मला माहिती आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट