‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

नितीन वाघमारे मृत्युप्रकरणी, नोबल हॉस्पिटलची चौकशी सुरु

बहुजन विद्यार्थी संघटनेकडून मान्यता रद्द करण्याची मागणी.

नोबल हॉस्पिटलचे  डॉक्टर आणि व्यवस्थापण नितीनच्या मृत्यूस जबाबदार,
      ---   अनिल वाणी, प्रदेशाध्यक्ष ब.वि.स 


भिवंडी : आंबेडकरी चळवळीचा तरुण कार्यकर्ता नितीन वाघमारे यांचा भिवंडीतील नोबल हॉस्पिटल च्या डॉक्टरांनी आणि व्यवस्थापणाने नितीन वाघमारे यांचा खून केल्याचा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  अनिल वाणी यांनी केला असून सिव्हिल सर्जन च्या आधीपत्याखाली चौकशी समिती नेमली असून नोबल हॉस्पिटलची चौकशी सुरु झाल्याने डॉक्टरांसहित व्यवस्थापनाचे धाबे दनानलेले आहेत. 
            भिवंडी शहरातील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ता नितीन वाघमारे यांच्या छातीत दुखत असल्याने टू डी इको काढण्यासाठी नोबल हॉस्पिटल मध्ये दि.१८ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता तपासणीसाठी गेला असताना नोबल हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी डॉक्टर अफान खान यांनी तपासणी करून अँजिओग्राफी करण्यात आली. यामध्ये हृदयाला छोटासा होल आहे तोही एकदम खाली असल्याने घाबरण्याची काही कारण नाही. आपण ऍडमिट करून घेऊया दोन दिवसात गोळ्या औषध देऊन बरं होईल असे नितीन वाघमारे यांना सांगून ऍडमिट करून घेतले आणि डॉक्टर अफान खान औरंगाबादला निघून गेले. त्यानंतर नितीन वाघमारे यांच्यावरती डॉक्टर देवयानी पाटील आणि डॉक्टर श्वेता शेळके या उपचार करू लागल्या 

           
    दि. १८ एप्रिल च्या  रात्री साडे अकराच्या सुमारास  चुकीचे इंजेक्शन दिल्याने नितीन वाघमारे यांना रक्ताची उलटी झाली. त्यातच त्यांनी पुन्हा दुसरा इंजेक्शन दिल्याने नितीन वाघमारे जी तब्येत खालावली आणि दि. १९  एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीन वाघमारे चालत हॉस्पिटलमध्ये आला आणि दोन दिवसातच चुकीचे औषधोपचार करून नोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने नितीन चा खून केल्या असल्याचा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांनी केला आहे.

         
          या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांना लेखी निवेदन देऊन आजपर्यंत नोबल हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूची चौकशी करावी, डॉक्टरांची शैक्षणिक कागदपत्रे तपासावी, हॉस्पिटलच्या पॅनलवर असलेल्या डॉक्टरांची शहानिशा करावी, विविध शासकीय योजना अंतर्गत रुग्णांच्या माध्यमातून पैशांची अमाप लूट केली जाते त्याचीही चौकशी करण्यात यावी, नितीन प्रमाणे अनेक रुग्णांना मारले गेले असल्याने त्याचीही चौकशी व्हावी, नितीन वाघमारेच्या मृत्यू प्रकरणी दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून, व्यवस्थापनावरही गुन्हे दाखल करावेत.
             नोबल रुग्णालय हे रुग्णांच्या मृत्यूशी खेळत असल्याने त्याचा परवाना कायमचा रद्द करण्यात यावा अशा मागण्या बहुजन विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आलेल्या असून त्याची सखोल चौकशी सिविल सर्जन च्या अधिपत्याखाली एका समितीद्वारे सुरू करण्यात आलेली आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट