ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पहिल्याच पावसात विवळवेढे उड्डाणपुलावर डांबरीकरण उखडले


पाण्याचा निचरा करण्यासाठी पोलिसांचा पुढाकार

डहाणू : पालघर जिल्ह्यातील विवळवेढे येथील उड्डाणपुलावरील दुरावस्थेमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी उड्डाणपुलाच्या गुजरात वाहिनीवर पाणी साचल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता मुंबई वाहिनीवर रस्त्याला मोठा खड्डा पडला आहे. अनेक महिन्यांपासून खड्डेमय असलेल्या पुलावर एप्रिल महिन्यात नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत हे डांबरीकरण पूर्णपणे उखडून याठिकाणी मोठा खड्डा झाला आहे.

पावसामुळे पुलावरील गुजरात वाहिनीवर पाणी साचत असून मुंबई वाहिनीवर खड्डा पडल्याने झाल्याने या पुलावरून प्रवास करणाऱ्या चालकांसाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अनेक वाहने पंक्चर होऊन चालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तसेचवेगवान वाहनांमुळे या ठिकाणी अपघाताची गंभीर शक्यता निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती केली आहे. महामार्गाच्या राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरण करण्यासाठी साधारण ५५० कोटी रुपयांचा मोठा खर्च करण्यात आला आहे. एवढा मोठा निधी खर्च करूनही उड्डाणपुलावर तांत्रिक कारणांमुळे डांबर टाकण्यात आले आहे. मात्र डांबरीकरणाचा दर्जा चांगला नसल्यामुळे पहिल्याच पावसात हे डांबरीकरण उखडले असून संपूर्ण कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विवळवेढे, सोमटा सह अन्य काही उड्डाणपुलावर पाणी साचल्यानंतर प्रशासनाने मोऱ्या साफ करून पाण्याचा निचरा केला होता. मात्र, पुलावर मोठ्या प्रमाणात साचलेली वाळू आणि कचरा वाहून पुन्हा त्याच मोऱ्यांमध्ये अडकल्याने पाण्याचा मार्ग बंद झाला होता.

ही परिस्थिती लक्षात घेऊन कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील आणि कर्मचारी सागर हंगारे यांनी स्वतः पुढाकार घेत मोऱ्यांमधील कचरा स्वतः हाताने काढून साचलेल्या पाण्याचा निचरा केला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघात टळले आहेत. मात्र महामार्ग प्रशासनाच्या पावसाळ्यापूर्वीच्या ढिसाळ नियोजनाचा नमुना यामुळे समोर आला आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट