श्रीवर्धनमध्ये वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; नागरिक व पर्यटक त्रस्त
ना जोरदार पाऊस ना सोसाट्याचा वारा तरीसुद्धा............
श्रीवर्धन : श्रीवर्धन शहरात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठ्याचा मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा पाहायला मिळत आहे. साधारणपणे जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे वीज खंडित होत असल्याचे प्रकार घडत असतात, मात्र यावेळी कोणताही मोठा पाऊस किंवा वादळी वारे नसतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात अवघ्या पाच-दहा मिनिटांच्या अंतराने वीज गायब होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सध्या उष्णतेची तीव्रता वाढलेली असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही-लाही होत होती. वारंवार लाईट जात असल्याने अनेकांची रात्रीची झोपही पूर्ण होऊ शकली नाही.
सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. शहरातील अनेक हॉटेल्स व लॉजेस पूर्ण भरले असून काही ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी जागा मिळणेही कठीण झाले होते. अशा परिस्थितीत वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.
नागरिकांनी महावितरण प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच कोणतेही नैसर्गिक कारण नसताना वारंवार वीज खंडित का होत आहे, याबाबतही स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times