‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

श्रीवर्धनमध्ये वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; नागरिक व पर्यटक त्रस्त

ना जोरदार पाऊस ना सोसाट्याचा वारा तरीसुद्धा............
श्रीवर्धन : श्रीवर्धन शहरात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठ्याचा मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा पाहायला मिळत आहे. साधारणपणे जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे वीज खंडित होत असल्याचे प्रकार घडत असतात, मात्र यावेळी कोणताही मोठा पाऊस किंवा वादळी वारे नसतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात अवघ्या पाच-दहा मिनिटांच्या अंतराने वीज गायब होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सध्या उष्णतेची तीव्रता वाढलेली असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही-लाही होत होती. वारंवार लाईट जात असल्याने अनेकांची रात्रीची झोपही पूर्ण होऊ शकली नाही. सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. शहरातील अनेक हॉटेल्स व लॉजेस पूर्ण भरले असून काही ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी जागा मिळणेही कठीण झाले होते. अशा परिस्थितीत वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. नागरिकांनी महावितरण प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच कोणतेही नैसर्गिक कारण नसताना वारंवार वीज खंडित का होत आहे, याबाबतही स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट