‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

*खोपोली पोलिसांची स्मार्ट कामगिरी! ४० गहाळ मोबाईल शोधून नागरिकांच्या चेहऱ्यावर आणले पुन्हा हास्य*

*तब्बल ६.९६ लाखांचे मोबाईल हस्तगत; आतापर्यंत १६२ मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द..*

वावोशी / जतिन मोरे : कधी गर्दीत, कधी प्रवासादरम्यान तर कधी नकळत हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल, अशी आशाच अनेक नागरिक सोडून देतात. मात्र खोपोली पोलिसांनी आपल्या तत्परतेने, तांत्रिक कौशल्याने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल ४० नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवला आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध नागरिकांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी ‘CEIR’ (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) या आधुनिक प्रणालीचा प्रभावी वापर केला. तांत्रिक तपास, माहिती संकलन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या माध्यमातून पोलिसांनी तब्बल ६ लाख ९६ हजार रुपये किमतीचे ४० मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे, हे मोबाईल केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागांसह इतर राज्यांमध्ये वापरात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित मोबाईलचा मागोवा घेत अखेर ते हस्तगत केले. दि. २३ मे २०२६ रोजी खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. हरवलेली मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत खोपोली पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, यापूर्वीही खोपोली पोलिसांनी १२२ गहाळ मोबाईल हस्तगत केले होते. आतापर्यंत एकूण १६२ मोबाईल फोन, सुमारे ४० लाख ३१ हजार ३०० रुपये किमतीचे, शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ही उल्लेखनीय कामगिरी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली, खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड, रामा मासाळ, निलेश कांबळे, वाल्मीक वाडगे, शुभम जाधव, किरण देवकाते, आकाश डोंगरे, समीर पवार आणि प्रशांत दबडे यांनी अथक परिश्रम व तांत्रिक कौशल्याच्या जोरावर यशस्वीपणे पार पाडली.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट