सुप्रिम कंपनी व्यवस्थापनाच्या दुतोंडी भुमिकेचा नामदार भरतशेठ गोगावले यांनी घेतला समाचार
नागोठणे (किरण लाड) : स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ तसेच त्यांच्या मागणी अर्जांना कोणतेही उत्तर न देणा-या,स्थानिकांमध्ये आप आपसात भानगडी लावण्याचा प्रयत्न करणा-या आमडोशी वांगणी येथील सुप्रीम पेट्रोकेम कंपनीच्या व्यवस्थापनला नामदार भरत शेठ गोगावले यांनी धारेवर धरले आहे.
सुप्रीम पेट्रोकेम कंपनी वांगणी आमडोशी येथील स्थानिकांचे मागणी अर्ज स्विकारण्यास टाळाटाळ करते तसेच कायमस्वरुपी व हंगामी स्वरुपात नोकरी,व अन्य रोजगार देण्यास टाळाटाळ करते अशा अनेक प्रश्नांची उकळ करण्यासाठी स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी नागोठणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुमित काते व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली वांगणी व आमडोशी येथील स्थानिक व शिवसैनिक सुप्रीम पेट्रोकेम कंपनीच्या गेटवर शनिवार 23 मे रोजी गेले असता कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी हजर नाहीत हे कारण देवून वरील विषया संदर्भात दोन ते चार दिवसात कंपनी व्यवस्थापक आपल्याला कंपनीत बोलवून घेतील असे तेथील आंदोलकांना सांगितले गेले परंतु कंपनी व्यवस्थापनाने स्थानिकांच्या प्रश्नांची उकल करण्याच्या ऐवजी वांगणी आमडोशी गावातील ग्रामस्थांमध्ये आप आपसात भानगडी लावण्याचा प्रयत्न केला असा येधील स्थानिकांनी सुप्रीम कंपनीच्या व्यवस्थापनावर आरोप केला.बुधवार 27 मे रोजी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले कानसई येथे आले असता त्यांच्या समोर सुप्रीम कंपनी व्यवस्थापनाच्या दुतोंडी भुमिकेचा पाडा वांगणी,आमडोशी येथील ग्रामस्थांनी मांडला यावेळी नामदार भरतशेठ गोगावले यांनी ताबडतोब सुप्रीम कंपनी चे अधिकारी वागळे यांना फोन लावून वरील विषया संदर्भात विचारणा करुन लवकरच तोडगा काढा आणि येथील स्थानिकांना न्याय दया असे खडसावून सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सुमित काते,रोहा उपतालुका मनोज खांडेकर,कृष्णा धामणे,प्रविण ताडकर,दिनेश घाग,प्रसाद जाधव,जयेश जाधव,संजय कणघरे,निलेश साळवी, जलील शिंदी हे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक तसेच वांगणी,आमडोशी येथील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.सुप्रीम पेट्रोकेम कंपनी 337 एकर जागेमध्ये बसलेली आहे.सन 1995 मध्ये या कंपनीसाठी आमडोशी, वांगणी, वरवठणे तसेच आजुबाजुच्या गावातील स्थानिकांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत.कंपनीचे प्रमुख उत्पादन पाॅलिस्टीरिन असून हे हलके कृत्रिम पाॅलिमर आहे ते दोन मुख्य स्वरूपात आढळते एक कडक पारदर्शक प्लास्टिक आणि दुसरा हलका फोम.स्थानिकांच्या प्रश्नांबाबत नामदार भरतशेठ गोगावले यांनी सुप्रीम कंपनीला चांगलेच धारेवर धरले आहे कंपनी व्यवस्थापन याबाबत कशी रिप्लाय देतेय ते काही दिवसात समजेल.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times