श्रीवर्धन तालुक्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न गंभीर; श्रीवर्धन शिक्षण विभाग कारवाई करणार का?
रायगड श्रीवर्धन : (रामचंद्र घोडमोडे) जिल्ह्यात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या शाळांची नावे वेळोवेळी जाहीर करण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात त्या शाळांवर ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र समोर येत आहे. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील काही शाळांचाही समावेश असल्याचे बोलले जात असून, आता १५ जूननंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने अशा शाळांबाबत शिक्षण विभाग नेमकी कोणती भूमिका घेणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून काही शाळा आवश्यक शासन मान्यता, परवानगी अथवा शिक्षण विभागाच्या नियमांचे पालन न करता सुरू असल्याचे आरोप होत आहेत. मात्र, संबंधित शाळांची नावे जाहीर करण्यापलीकडे शिक्षण विभागाने कोणतीही प्रभावी कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. परिणामी अशा शाळा आजही जोमात सुरू असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत आहे. अशा शाळांकडून दिले जाणारे दाखले, प्रमाणपत्रे किंवा शैक्षणिक नोंदी पुढे वैध ठरणार की नाही, याबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना प्रवेश, शिष्यवृत्ती, शासकीय योजना किंवा इतर शैक्षणिक प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. श्रीवर्धन तालुका शिक्षण विभागाने कारवाई करायची की रायगड जिल्हा शिक्षण विभागाने, याबाबत स्पष्टता नसल्याने प्रशासनातील जबाबदारी एकमेकांकडे ढकलली जात असल्याची चर्चा आहे. परिणामी प्रत्यक्ष कारवाई मात्र होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पालकांना शिक्षण विभागाच्या मान्यतेसंदर्भातील नियमांची पुरेशी माहिती नसल्याने अनेक पालक अनवधानाने अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश देतात. त्यामुळे शासनाने तसेच स्थानिक शिक्षण विभागाने जनजागृती मोहीम राबवून अधिकृत व अनधिकृत शाळांची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
शिक्षणाचा अधिकार कायदा, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था नियम तसेच शासनाच्या शिक्षणविषयक धोरणानुसार विनापरवानगी किंवा नियमबाह्य पद्धतीने शाळा चालविणे गंभीर बाब मानली जाते. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी श्रीवर्धन शिक्षण विभागाने अशा शाळांची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून केली जात आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times