..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

कासाडी प्रदूषणाच्या विळख्यात

तळोजा : तळोजा औद्योगित वसाहतीतील कारखान्यांतून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने कासाडी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. याचा फटका परिसरातील मच्छीमारांना सहन करावा लागत आहे. राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी याची गंभीर दखल घेतली असून नदीचे पात्र प्रदूषित करणार्‍या कारखान्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

तळोजा औद्योगिक वसाहतीच्या पूर्वेकडून पश्चिमेस कासाडी नदी वाहते. हाजीमलंग डोंगराच्या पायथ्यापासून स्वच्छ व पारदर्शक असा निर्मळ पाण्याचा प्रवाह या नदीतून वाहतो. परंतु नदीचा प्रवाह तळोजा औद्योगिक वसाहतीच्या जवळ येताच पाण्याचा रंग बदलतो. कासाडी नदीची प्रदूषणामुळे नाल्यात रुपातंर होत आहे. तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलला आहे. पाण्याला काळा, निळा, लाल, हिरवा असे रंग प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या नदीच्या पात्रात मासेमारी करणार्‍या स्थानिकांच्या रोजगारावर गदा आली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात नदीचे पाणी आणखी गडद होते. नदीच्या पात्रात सोडल्या जाणार्‍या दूषित पाण्यामुळे मासे व इतर जलजीवांना धोका निर्माण झाला आहे. मासे मृत पावण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. शिवाय या नदीत आढळणारे खेकडा, कटले, चिवणी, लहान कोळंबी, जिताडा या माशांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण मंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मात्र आता खुद्द पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनीच या प्रकरणी कारवाई करण्याचे संकेत दिल्याने प्रदूषणकारी कारखान्यांचे धाबे दणाणले आहेत. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट