‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

म्हसकरवाडी येथे गुरांच्या गोठ्याला भीषण आग लाखोंचे नुकसान; वर्षभर साठवलेले वैरण भस्मसात


रोहा :  रोहा तालुक्यातील म्हसकरवाडी येथे गुरुवारी दुपारी दुग्धव्यावसायिक अमर घाग यांच्या गुरांच्या गोठ्याला अचानक भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत गुरांसाठी वर्षभर साठवून ठेवलेले वैरण पूर्णपणे जळून खाक झाले असून गोठ्याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
          आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरे व नागरिकांचा जीवितहानीपासून बचाव झाला. वेळेत आग नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, या घटनेमुळे शेतकरी अमर घाग यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. पावसाळा तोंडावर असताना गुरांना निवारा व चाऱ्याची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. कोलाड तलाठी कार्यालयाकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


           
अमर घाग हे दुग्धव्यवसायावर आपला उदरनिर्वाह करणारे शेतकरी असून दुभत्या म्हशींसाठी त्यांनी मोठ्या कष्टाने वैरण साठवून ठेवले होते. मात्र, आगीच्या घटनेत सर्व काही भस्मसात झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.
सध्या परिसरात पुरेसा पेंढा उपलब्ध नसल्याने चाऱ्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेली मर्यादित शेती आणि घटलेले भात उत्पादन यामुळे पेंढ्याची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी पेंढ्याचे दर शेकडा सतराशे ते अठराशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा स्थानिक शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

माझ्या दुभत्या म्हशीना पावसाळ्यात पुरेल इतके वैरण वाड्यात ठेवले होते. आता पेंढा भेटत नाही आणि भेटला तर भरपूर पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे मला शासनाने तातडीची मदत द्यावी.

अमर घाग 
दुग्धव्यावसायिक, म्हसकरवाडी रोहा

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट