स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार, मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या प्रकल्पांवर मनसेचा आक्रमक पवित्रा
माणगाव बायपास रस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी; महाड येथे पत्रकार परिषद स्थानिक भूमी पुत्र रोजगार हाच प्रमुख उद्देश. : श्री राज पार्टे
महाड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष श्री. राज पार्टे यांनी महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न, मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेले प्रकल्प, माणगाव बायपास रस्ता तसेच टोल नाक्यांवरील मराठी भाषेच्या वापराबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली.
यावेळी बोलताना श्री. पार्टे म्हणाले की, दक्षिण रायगड जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. सध्या विविध व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रांमध्ये परप्रांतीयांचे प्रमाण वाढत असून स्थानिक युवकांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आली असून स्थानिकांना रोजगार मिळाल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक प्रकल्प अद्याप रखडलेले असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शासनाने या प्रकल्पांना गती देऊन तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच माणगाव बायपास रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, असेही ते म्हणाले.
टोल नाक्यांवरील सूचना फलकांवर मराठी भाषेचा उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य मिळालेच पाहिजे. जर सूचना फलकांवर मराठी भाषेचा वापर करण्यात आला नाही, तर मनसे आपल्या शैलीत आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला. महाड तसेच माणगाव औद्योगिक कारखाने मध्ये प्रथम स्थानिकांना रोजगार देण्याची प्रमुख मागणी मनसे असणार असुन याशिवाय रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटन अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून, मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी आदेश दिल्यास पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही पत्रकार परिषद महाड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष श्री. राज पार्टे यांच्या उपस्थितीत दक्षिण रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times