खारपाडा टोलविरोधात जनआक्रोश तीव्र; प्रशासन झोपेत?
मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी दि. २५मे पासून मुंबई गोवा जनआक्रोश समितीचे पदाधिकारी ठिय्या आंदोलनास बसले असून आता आंदोलन अधिक आक्रमक व निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे.
तसेच दि. २९मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली मात्र अत्यंत संतापजनक बाब म्हणजे अजूनपर्यंत पनवेल ग्रामीण पोलीस प्रशासन, NHAI अधिकारी, संबंधित शासकीय यंत्रणा, आमदार, खासदार किंवा कोणत्याही राजकीय नेत्याने उपोषणकर्त्यांची साधी भेटही घेतलेली नाही. इतकेच नव्हे तर, आमरण उपोषण सुरू असतानाही कोणत्याही शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही यामुळे आंदोलनकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले की रस्ते अपूर्ण, जीव धोक्यात आणि तरीही टोल वसुली सुरू… हा सरळसरळ कोकणवासीयांवर अन्याय होत आहे.
कोकणकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका,
टोल बंद झालाच पाहिजे.असा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच हे आंदोलन शांततापूर्ण आणी लोकशाही मार्गाने सुरु असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही प्रशासनाला सहकार्य करू असे या वेळी आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times