परिवहन मंत्र्यांची वडखळ येथील एसटी बसस्थानकाला अचानक भेट....
व्यवस्था, प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेची सविस्तर पाहणी.
पेण दीपक लोके : परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक हे कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी आज वडखळ येथील बस स्थानकाला अचानक पणे भेट देऊन तेथील सुविधा स्वच्छता याबद्दल प्रवासी वर्गांशी संवाद साधला व पेन कर्मचाऱ्यांची अधिकार वर्गांशी संवाद साधून वडखळ बस स्थानक व्यवस्था स्वच्छता बस स्थानक मते झाडे लावण्याचा संदर्भात चर्चा करून त्यांना आदेश देण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष असलेले प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकावर उपस्थित प्रवाशांशी संवाद साधत बसेस वेळेवर येतात का, उपलब्ध सुविधा समाधानकारक आहेत का, तसेच स्वच्छतेबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. प्रतीक्षालय, तिकीट व्यवस्था आणि इतर सुविधांचा आढावा घेतल्यानंतर प्रसाधनगृहांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत असमाधान व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक सुधारणा करण्याच्या तसेच स्वच्छतेबाबत नियमित दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
तसेच १ जून पासून आपण राज्यभरात ७८ हजार वृक्ष लागवड करणार आहोत. तसेच वडखळ स्थानक परिसर अधिक हिरवागार आणि प्रवाशांसाठी सुखद बनविण्याच्या दृष्टीने बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीलगत सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्याचे निर्देश देण्यात आले.
एसटी प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळावी, तसेच प्रत्येक बसस्थानक हे प्रवासीहिताचे आदर्श केंद्र बनावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times