ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

फिफा वर्ल्ड कप २०२६ चा फीव्हर


                                     कोल्हापूर फुटबॉलमयगल्लीबोळात विश्वचषकाची चर्चा


कोल्हापूर (सुरेश आंबुसकर) : अमेरिका
, कॅनडा आणि 
मेक्सिको या तीन देशांमध्ये ११ जून ते १९ जुलै 202६ या कालावधीत होणान्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धे चा थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूरातील फुटवॉनप्रेमी आणि क्रीडारसिक उत्सुक झाले आहेत. जगातील सर्वोच्च  फुटबॉल स्पर्धेतील सामने, नामांकित स्टार खेळाडूंचा खेळ आणि नवोदित प्रतिभावंतांचे कौशल्य पाहण्यासाठी शहरातील चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

फुटबॉलची शंभर वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये विश्वचषक स्पर्धेचे वेध लागले असून शहरभर फुटबॉलचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नसला तरी कोल्हापूरकरांच्या उत्साहात कोणतीही कमतरता दिसून येत नाही. उलट फिफा बर्ल्ड कप २०२६ चा फिव्हर शहरातील प्रत्येक चौक, गल्ली आणि कट्ट्यावर जाणवत आहे. उपनगरांमध्येही या जागतिक फुटबॉल स्पर्धेची चर्चा आहे.

शहरातील विविध पेठा, गल्ली-बोळ आणि प्रमुख चौकांमध्ये जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंचे डिजिटल फलक झळकत आहेत. अजे टिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी, पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो, ब्राझीलचा नेमार तसेच फ्रान्सचा किलियन एमबाप्पे यांच्यासह अन्य नामवंत खेळाडूंच्या छायाचित्रांनी शहर सजले आहे. अनेक ठिकाणी अर्जे टिना, ब्राझील, पोर्तुगाल, स्पेन, इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स या संघांचे ध्वज, पताका आणि संघांच्या किटवर आधारित सजावट करण्यात आली आहे.

स्थानिक फुटबॉल क्लब, मंडळे आणि विविध ग्रुप तसेच फुटबॉलप्रेमींनी विश्वचषकाच्या स्वागतासाठी विशेषपोस्टर्स, बॅनर्स आणि शुभेच्छा फलक उभारले आहेत.शहरातील विविध भागांमध्ये कोणता संघ बिजेता ठरेल, कोणता खेळाडू सर्वाधिकगोल करेल आणि यंदाच्या स्पर्धेतील संभाव्य विजेता कोण असेल, याबाबत रंगलेल्या चचौना उधाण आले आहे.

दरम्यान, क्रीडा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्येही विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहेत. विविध देशांच्या जर्सी, फुटबॉल, शूज आणि अन्य क्रीडा साहित्याची आकर्षक मांडणी करण्यात आली असून ग्राहकांचा प्रतिसाद बाढत आहे. नामांकित खेळाडूंच्या छायाचित्रांसह सजविलेल्या दुकानांकडे युवक आणि बालचमुंचे विशेष आकर्षण दिसून येत आहे. फुटबॉलप्रेमी कोल्हापूरकर रात्री उशिरापर्यंत सामने पाहण्यासाठी तयारी करत असून अनेक ठिकाणी सामूहिक प्रक्षेपणाचे नियोजनही सुरू आहे.

एकंदरीत, फिफा वर्ल्ड कप २०२६च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर पूर्णपणे फुटबॉलमय झाले असून चौका-चौकात, गल्ली-बोळात आणि कट्ट्यांबर रंगणाऱ्या चर्चामधून फुटबॉलप्रेमींची स्पर्धेबाबतची उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत आहे. आगामी महिनाभर कोल्हापूरकरांबर विश्वचषक फुटबॉलचा रंग चढलेला पाहायला मिळणार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट