ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पावसाळी साहित्यांनी सजली तळा बाजारपेठ.


                                                        शालेय साहित्य खरेदीला वेग.
तळा श्रीकांत नांदगावकर :-  शाळा सुरू होण्यास अवघा तीन दिवसांचा कालावधी उरला असल्याने शालेय साहित्य खरेदीला वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.यावर्षी पाऊस लांबला असला तरी पावसाळ्यात लागणाऱ्या साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे.तळा बाजारपेठेत शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य बाजारात दाखल झाले असून विद्यार्थी व त्यांच्या पालकांची शालेय साहित्य खरेदीसाठी रेलचेल सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे.सर्व शाळा १५ जूनला सुरू होणार असल्याने बाजारपेठेत वह्या, दप्तर, टिफीन, रेनकोट, छत्र्या, बुट, चप्पल, कमरपट्टे, पेन, कंपासपेटी व इतर साहित्य दुकानदारांनी विक्रीस आणले आहेत. मात्र मागील वर्षापेक्षा यावर्षी किंमती वाढल्याचे दिसत आहे. तरीही ग्राहक, विद्यार्थी पालक बाजारात वस्तू खरेदीसाठी सध्या मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसत आहे.तसेच नागरिकही पावसाळपूर्व छत्र्या, मेनकापड, रेनकोट इत्यादी साहित्य खरेदी करताना पहावयास मिळत आहेत.मात्र यावर्षी सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने पालकांना अधिकचा आर्थिक फटका बसला आहे.
शालेय वस्तूंची बाजारातील किंमत.
बाजारात कटवही २०० पेजेस ४२० रूपये डझन, फुलसाईझ २०० पानी वही एक डझन ५२० रूपये, तर छत्रीचे भाव २०० रूपयांपासून पुढे ५०० पर्यंत, टीफीन डबा प्लास्टिक ८० रूपयापासून २०० दरम्यान तसेच स्टील डब्बे १८० ते ३०० दरम्यान, वॉटर बॅग ६० ते १०० पर्यंत व स्टील २०० ते ४०० दरम्यान, रेणकोट १५०, ते ९०० च्या दरम्यान या प्रमाणे वस्तूंचे सध्या बाजारात भाव आहेत.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट