ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

जगबुडी नदीत तिघा भावांचा दुर्दैवी मृत्यू

खेड : सुट्टीचा आनंद घेण्यासाठी खेड येथे नातेवाईकांकडे आलेल्या तिघा सख्या भावांवर काळाने घाला घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे या तिघा भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकाला वाचवण्यात यश आले.

मूळचे सांगली जिल्ह्यातील आणि मुंबईतील कुर्ला येथे वास्तव्यास असलेले हे तिघे भाऊ उन्हाळी सुट्टीसाठी खेड येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास ते आणखी एका नातेवाईकासोबत जगबुडी नदीत पोहाण्यासाठी गेले. मात्र नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने चौघेही खोल पाण्यात अडकले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारवाडा परिसरात राहणाऱ्या अनिल दगडू कांबळे यांचे चार पुतणे मुंबईवरून आले होते. उकाडापासून दिलासा मिळावा तसेच पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ते जगबुडी नदीच्या पात्रात उत्तरले होते. बदामीच्या पन्या येथील खोल डोहात ते पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही बुडू लागले.

यावेळी त्यांनी मदतीसाठी आसद्राओरड केली. मात्र डोहातील खोल पाणी व प्रवाहामुळे तिथे जाण पाप्ययात बेपत्ता झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत गोपाळ रामा कांबळे (वय ४०) या मोठ्या भावाचा सुदैवाने जीव वाचाला, तर त्याच्या मागील तीन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये आकाश रामा कांबळे (वय २३), नरेश रामा कांबळे (वय २२) आणि कैलास रामा कांबळे (वय १७) यांचा समावेश आहे. हे सर्व मूळचे सांगली येथील असून सध्या मुंबईतील चेंबूर मेट्रो स्टेशन परिसरात वास्तव्यास होते.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी  स्थानिक नागरिकांच्या मदतीने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या तीन मुलांना गमावल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता, नदी, डोह व धरण परिसरात पोहण्यासाठी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी आवस्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट