ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

महड देवस्थानच्या जागेच्या सर्व्हेला मंगलम् कंपनीचा अडथळा


            कंपनी व्यवस्थापनाविरोधात तीव्र संताप; अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परतावे लागले

खोपोली : (सारिका सावंत)  कुंभिवली येथील कापूर उत्पादक मंगलम् कंपनीच्या परिसरात श्री क्षेत्र महड देवस्थानची सुमारे ५२ गुंठे जागा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या जागेची शासकीय मोजणी (सर्व्हे) करण्यासाठी गुरुवारी (दि. ११ जून) भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, देवस्थानचे विश्वस्त व कर्मचारी कंपनीत दाखल झाले होते. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने त्यांना प्रवेश नाकारल्याने सर्व्हेची प्रक्रिया रखडली असून कंपनी व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

श्री क्षेत्र महड देवस्थानच्या मालकीची सर्व्हे क्रमांक २७/१ आणि २५/३ मधील ५२ गुंठे जागा मंगलम् कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असल्याचा दावा देवस्थानकडून करण्यात आला आहे. या जागेची अधिकृत मोजणी करण्यासाठी देवस्थानने शासनाकडे आवश्यक शुल्क भरून परवानगी घेतली होती.

त्यानुसार भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीदार अधिकारी दीपमाला राजपूत या पोलिस बंदोबस्तासह कंपनी परिसरात दाखल झाल्या. त्यांच्यासोबत देवस्थानचे विश्वस्त किरण काशिकर, व्यवस्थापक अतुल टट्टू व अन्य कर्मचारी उपस्थित होते. मात्र, कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांना अडविण्यात आल्याने सर्व्हेचे काम सुरू होऊ शकले नाही.

अधिकारी व देवस्थानचे प्रतिनिधी सुमारे तीन ते चार तास कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर थांबून होते. अखेर कंपनीकडून प्रवेश न मिळाल्याने मोजणीदार अधिकारी दीपमाला राजपूत यांनी सर्व्हेसाठी कंपनीत प्रवेश नाकारण्यात आल्याचा पंचनामा केला. उपस्थित साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्यांनी परतावे घेतले.

चौकट

"श्री क्षेत्र महड देवस्थानच्या मालकीची ५२ गुंठे जागा मंगलम् कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या जागेच्या शासकीय मोजणीसाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसह उपस्थित होतो. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने प्रवेश देण्यास नकार दिल्याने सर्व्हे होऊ शकला नाही. तरीही ही मोजणी पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढील काळात आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहोत."

किरण काशिकर,
विश्वस्त, श्री क्षेत्र महड देवस्थान


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट