When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

खोपोली शहराला अखंड व सुरक्षित वीज पुरवठा द्या नंतरच स्मार्ट मीटरबाबत निर्णय घ्या संघर्ष समितीचा निवेदन

  • by
  • Jun 15, 2026

खोपोली - सारिका सावंत 
शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत तीव्र नाराजी असतानाच
स्मार्ट मिटर बसविण्याठी घाईगडबड सुरू असल्याने खोपोली-खालापूर तालुका संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले असून खोपोली शहराला अखंड व सुरक्षित वीज पुरवठा द्या नंतरच स्मार्ट मीटरबाबत निर्णय घ्या अशी प्रमुख मागणी केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष समिती सातत्याने खोपोली शहराला दर्जेदार,अखंड व सुरक्षित वीज पुरवठा मिळावा यासाठी पाठपुरावा करत आहे. पावसाळ्यात तसेच इतर काळात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे सामान्य नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण तसेच उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. खालापूर हा महत्त्वाचा औद्योगिक तालुका असून अशा प्रकारच्या वीज समस्येमुळे उद्योगांचे व पर्यायाने देशाच्या आर्थिक प्रगतीचेही नुकसान होत आहे.
संघर्ष समितीने महावितरणकडे शहरामध्ये भूमिगत वीज केबल टाकण्यासह वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत राहण्यासाठी ठोस नियोजन करण्याची मागणी केली. तसेच वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान झाल्यास त्याबाबत महावितरणची नुकसान भरपाईची काय तरतूद आहे, याची स्पष्ट माहिती देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी संघर्ष समितीने स्पष्ट भूमिका घेतली की, जोपर्यंत खोपोलीकरांना अखंड व दर्जेदार वीज पुरवठ्याची खात्री मिळत नाही, तोपर्यंत शहरात स्मार्ट मीटरची सक्ती करण्यास नागरिकांचा विरोध कायम राहील. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून कोणताही निर्णय लोकांवर लादला जाऊ नये. महावितरणने सक्ती करण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष समिती लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र लढा उभारेल, असा इशाराही देण्यात आला.
खोपोलीच्या नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष समिती सदैव कटिबद्ध असून, आवश्यक असल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल.
यावेळी खोपोली-खालापूर तालुका संघर्ष समिती च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी निळकंठ सोसायटी खोपोलीच्या वतीनेही स्मार्ट मीटर संदर्भात निवेदन दिले.
पुढील दिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येईल असे संघर्ष समितीच्या वतीने संजय करंजकर यांनी स्पष्ट केले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट