आवंढे –तोरणपाडा पूल अत्यंत धोकादायक प्रशासनाचे दुर्लक्ष
- by
- Aug 20, 2026
मोठा अनर्थ होण्याची भीती आवंडे ते तोरणपाडा संपर्क तुटण्याचा धोका
पाली : आवंडे पेढली परिसरातील आवंढे ते तोरणपाडा या अत्यंत महत्त्वाच्या गावांना जोडणारा पूल सध्या अत्यंत धोकादायक व जिर्ण अवस्थेत पोहोचला आहे. अरुंद व ढासळत चाललेल्या या पुलाकडे संबंधित प्रशासन व प्रशासकीय यंत्रणेचे सतत दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप आवंडे येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते अशोक देशमुख यांनी केला आहे. प्रशासनाच्या या बेफिकीर कारभारामुळे येथे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.
या पुलाच्या तातडीच्या मजबुतीकरणासाठी आणि कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी स्थानिक ग्रामस्थांसह अशोक देशमुख यांनी शासन व प्रशासनाकडे अनेकदा लेखी निवेदन व पाठपुरावा केला आहे. परंतु, वारंवार टाळाटाळ आणि दुर्लक्ष केल्यामुळे पुलाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली आहे. पुलाचे सिमेंट-काँक्रीट उखडले असून कडा ढासळल्या आहेत, ज्यामुळे येथून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे.
यंदाच्या जोरदार पावसात या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाहत होता. पाण्याचा प्रचंड वेग आणि पुराच्या ताणामुळे हा पूल पूर्णपणे वाहून जाण्याच्या स्थितीत आला होता. भविष्यात किंवा येत्या मुसळधार पावसात जर हा पूल तुटला अथवा वाहून गेला, तर आवंडे, तोरणपाडा तसेच परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांचा मुख्य रस्त्याशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटणार आहे.
याचा थेट फटका दररोज प्रवासासाठी या पुलावर अवलंबून असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना, रुग्णवाहिकांना, शेतकऱ्यांच्या मालाच्या वाहतुकीला आणि अत्यावश्यक सेवांना बसणार आहे. एखादी आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास गावात रुग्णवाहिका पोहोचणेही अशक्य होणार आहे.
हा पूल म्हणजे परिसरातील हजारो ग्रामस्थांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मुख्य जीवनवाहिनी आहे. मात्र, सध्या या पुलावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. पुराच्या पाण्यात हा पूल कधीही कोलमडू शकतो. पूल तुटून मोठा अनर्थ घडल्यानंतर प्रशासनाने जागे होऊन अश्रू पुसण्यात काहीही अर्थ नाही. जीवितहानी होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने या समस्येची गंभीर दखल घेऊन निधी उपलब्ध करावा व पुलाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करावे. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times