मिरा-भाईंदरमधील सत्ताधारी भाजपा लोकप्रतिनिधींचा नराधमांना राजाश्रय
अल्पवयीन पीडितेच्या न्यायासाठी शिवसेना महिला आघाडी आक्रमक, थेट राज्य महिला आयोगात धडक !
मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात मागील काही काळापासून महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारीने परिसीमा गाठली आहे. विशेषतः सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यावर गंभीर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल होत असल्याने शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या वाढत्या नराधमपणाला वाचा फोडण्यासाठी आणि पेणकरपाडा येथील एका अल्पवयीन पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आज मिरा भाईंदर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हा संघटक सौ. निशा नरेश नार्वेकर यांनी वांद्रे येथील मुख्यालयात जाऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना सविस्तर, रोखठोक निवेदन सादर केले.
यावेळी राज्य महिला आयोग सचिव यांना निवेदन देताना मिरा भाईंदर शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ. निशा नार्वेकर यांच्यासोबत भाईंदर पूर्व महिला शहर संघटक श्रीमती. पूजा आमगावकर, महिला जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती पाटील, मिरा रोड महिला शहर संघटक डॉ. नयना वसानी, भाईंदर पश्चिम महिला शहर संघटक सौ. सरिता शिंदे उपस्थित होत्या.
भाजपा नगरसेविकेचा सख्खा भाऊच नराधमः प्रकरणावर दडपण आणण्याचा प्रयत्न! शिवसेना महिला आघाडीने महिला आयोगाकडे मिरा-भाईंदरमधील भाजपाच्या गुन्हेगारीची संपूर्ण कुंडलीच मांडली आहे. काशिमिरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार आरोपी राजेश
चव्हाण याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला असून, त्याच्यावर 'पोक्सो' आणि 'भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हा मुख्य आरोपी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या विद्यमान अध्यक्षा तथा
यासंपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना शिवसेना महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर म्हणतात की, "मिरा-भाईंदर हे संतांची-सुसंस्कृतांची भूमी आहे, परंतु भाजपाच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींमुळे आज शहरातील महिला व भगिनी स्वतःला अत्यंत भयभीत आणि असुरक्षित समजत आहेत, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असल्याने काही वेळा पोलीसही यांना वाचविण्याचा प्रयत्न करतात.
२ जर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीचं नराधम आरोपींना पाठीशी घालत असतील, तर सामान्य महिलांनी न्याय मागायचा कोणाकडे? महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून पीडित अल्पवयीन मुलीला तात्काळ न्याय मिळवून द्यावा आणि पोलिसांना कडक निर्देश द्यावेत. जर या प्रकरणातील आरोपी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अनिता पाटील यांच्यावर ही कारवाई झाली नाही, तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल!"
भाजपा नगरसेविका अनिता पाटील यांचा सख्खा लहान भाऊ आहे. ही अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक बाब आहे.
पीडित अल्पवयीन मुलीने स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती वारंवार भाजपा नगरसेविका अनिता पाटील यांना दिली होती.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times