‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

"मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर नाकारल्याने संताप – सरनाईकांचा इशारा : 'मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही'"

मीरा-भाईंदर शहारात पुन्हा एकदा मराठी माणसाची गळचेपी ? मराठी असल्याकारणाने घर देण्यास नाकारणाऱ्या मालकाला सरनाईकांनी सुनावले खडे बोल ! "मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांना एकही वीट रचू देणार नाही": सरनाईक भाईंदर : मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी माणसाचा सन्मान राखावाच लागेल हाच बाणा पुन्हा एकदा दाखवून देत मीरा भाईंदरमध्ये घडलेल्या एका संतापजनक घटनेविरोधात महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि मीरा-भाईंदर लोकप्रतिनिधी प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. स्वतःच्या कष्टाने आणि स्वाभिमानाने 'शिंदे गुळाचा चहा आणि नाश्ता सेंटर' चालवून कुटुंबाचा आधार बनलेल्या मराठी भगिनी रविना शिंदे यांना 'तू मराठी आहेस' म्हणून घर नाकारण्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली. बिल्डर, गुंड आणि दादागिरी करणाऱ्यांना कडक इशारा
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले की, "महाराष्ट्राच्या मातीत राहून मराठी माणसाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. जर कोणी चुकीच्या पद्धतीने दादागिरी, दंडुकेशाही किंवा गुंडगिरी करत असेल, तर त्याला शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल. यापुढे कोणत्याही मराठी माणसाला घर नाकारले गेल्याचे समोर आले, तर तिथे जाऊन थेट जाब विचारा, अशा कडक सूचना मी सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत."
या घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी या नात्याने मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविना यांच्या स्टॉलला भेट देऊन तिच्या हातचा चहा पिला आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली आणि शिंदे कुटुंबाला धीर दिला. एवढेच नव्हे तर मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या त्या संबंधित घरमालकाला तत्काळ घटनास्थळी बोलावून घेत मंत्री सरनाईक यांनी अत्यंत कठोर शब्दात त्यांची कानउघडणी केली आणि त्याला कायदेशीर परिणामांची जाणीव करून दिली. या संतापजनक प्रकाराची केवळ दखल न घेता, मंत्री सरनाईक यांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. संबंधित घरमालकाविरोधात पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना तातडीने पत्र देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी माणसाच्या स्वाभिमानाशी आणि हक्काशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट