हिवताप प्रतिबंध महिन्यानिमित्त वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने महापालिका क्षेत्रात जनजागृती मोहिम
पनवेल :- राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या हिवताप दूरिकरण धोरण २०३० अंतर्गत पनवेल महानगरपालिका हद्दीत जून महिना हिवताप प्रतिबंध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका, चंडीपुरा व हत्तीरोग यांसारख्या कीटकजन्य आजारांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे तसेच आपला दवाखाना परिसरात वैद्यकीय अधिकारी , परिचारिका, आशा सेविका, यांच्या माध्यमातून ही जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पत्रके, फलक, प्रदर्शन संच, कॅलेंडर, स्टिकर्स आदी प्रचार साहित्याच्या माध्यमातून नागरिकांना हिवतापाची लक्षणे, उपचार व प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती दिली जात आहे. तसेच या मोहिमेदरम्यान हिवताप व इतर कीटकजन्य आजारांबाबत सविस्तर कृती आराखडा तयार करून त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे. अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.
याचबरोबर डास नियंत्रणासाठी गप्पी माशांचा उपयोग, परिसर स्वच्छता, वैयक्तिक सुरक्षा, मच्छरदाण्यांचा वापर तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती नागरिकांना दिली जात आहे. यासाठी आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला असून, जनजागृतीसाठी आशा सेविका व विविध संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे. याशिवाय रांगोळी, चित्रकला व निबंध स्पर्धांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात आहे.
पनवेल महानगरपालिकेने नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी त्वरित हटविणे आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times