ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार : एकनाथ शिंदे
सहा खासदारांच्या प्रवेशाने शिंदेंची शिवसेना आणखी भक्कम
२०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार
बाळासाहेबांच्या विचारांसाठी सहा खासदारांचा शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास
मुंबई : ४० आमदारांपासून सुरू झालेल्या २०२२ च्या राजकीय उठावानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा सातत्याने वाढत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. "आता एक नाही तर सहा टायगर आमच्यासोबत आहेत. चौकार नाही, षटकार मारला आहे," असे सांगत शिंदे यांनी हा प्रवेश बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विजयाचा आणि शिवसेनेच्या वाढत्या ताकदीचा पुरावा असल्याचा दावा केला.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले, तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सहा खासदारांचे स्वागत करताना शिंदे म्हणाले की, २२ जून २०२२ रोजी शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा वाचवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्याचा हा दुसरा टप्पा आहे. सुरुवातीला ४० आमदार सोबत होते, तर आज सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या लढ्याला नवे बळ दिले आहे. "आता एक नाही तर सहा टायगर आपल्या सोबत आहेत," असे ते म्हणाले. बाळासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा २३ असलेले शिवसैनिक अखेर शिवसेनेतच एकवटतात, असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, "जिथे शिवसेनेचे विचार, तिथे शिवसैनिक, त्यामुळेच हे सहा खासदार आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले आहेत."
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times