अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र युनिट : मुख्यमंत्री
मुंबई : राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. अमली पदार्थ व्यापार व सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्यातील अमली पदार्थ विक्री व सेवनासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सदस्य सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, अमीन पटेल, योगेश सागर आणि संजय क्षीरसागर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि सेवन हे केवळ महाराष्ट्रासमोरील नव्हे तर संपूर्ण देशासमोरील गंभीर आव्हान आहे. केंद्र शासनाने देशव्यापी अमली पदार्थविरोधी मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत राज्य शासनाने 'Whole of Government Approach' विकसित केला आहे. गृह विभागाच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये समन्वय साधून अवैध अमली पदार्थांची शेती, लागवड, उत्पादन, व्यापार, वाहतूक, विक्री आणि सेवन यांवर नियंत्रण आणण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
अमली पदार्थाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाद्वारेही जनजागृती करण्यात येत आहे. तसेच अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यात (NDPS Act) सुधारणा करण्याबाबत केंद्र शासनाला राज्य शासनाने सूचना पाठविल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
राज्य शासनाच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणानुसार NDPS कायद्यांतर्गत दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी च सेवेतून बडतर्फ कर्मचाऱ्यांना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, अमली पदार्थविरोधी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बढती, प्रोत्साहनपर लाभआणि विशेष नियुक्ती देण्यात येणार आहे. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्समध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर इच्छेनुसार बदलीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबई पोलिसांनी गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांत जाऊन यशस्वी कारवाया केल्या आहेत. २०२५ मध्ये अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स आणि पोलीस यंत्रणेमार्फत तब्बल ५२३.१७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times