सुधागडात खैर तस्करांवर वनविभागाची मोठी कारवाई
चार जण गजाआड लाकूड व वाहनांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त गावाकऱ्यांच्या अंगावर घातली स्कॉर्पिओ संतप्त गावकऱ्यांनी स्कॉर्पिओ फोडली
पाली :- सुधागड तालुक्यात सुरू असलेल्या खैर लाकडाच्या अवैध तस्करीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. धोंडसे आणि सिद्धेश्वर परिसरात वनविभागाने सापळा रचून दोन वाहनांसह लाखो रुपयांचा खैर लाकडाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान तस्करांवर संतापलेल्या स्थानिक ग्रामस्थांचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला असून, तस्करीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी अंगावर घातल्याने संतप्त जमावाने तस्करांच्या स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुधागड-पाली वनक्षेत्रात खैर लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार परीक्षेत्र वनाधिकारी विशाल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने धोंडसे व सिद्धेश्वर भागात नाकाबंदी केली. यावेळी संशयास्पद रित्या जाणाऱ्या दोन वाहनांना थांबवून त्यांची झडती घेण्यात आली. पहिले वाहन टेम्पो क्रमांक MH 06 CP 2260 मधून १४,२२६ रुपये किमतीचे बेकायदेशीर खैर लाकूड जप्त करण्यात आले. दुसरे वाहन स्कॉर्पिओ क्रमांक MH 06 AN 1276 मधून १३,३३९ रुपये किमतीचा खैराचा साठा जप्त करण्यात आला.
पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या आणि वनसंपत्तीची लूट करणाऱ्या तस्करांचा सुळसुळाट पाहून स्थानिक ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले होते. तस्करी सुरू असल्याचे समजताच धोंडसे-सिद्धेश्वर परिसरातील असंख्य नागरिक घटनास्थळी जमा झाले. तस्करांच्या या कृत्याविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी तस्करी करणारे वाहन अडवताना स्कॉर्पिओ चालकाने रिव्हर्स गियर टाकून ग्रामस्थांच्या अंगावर गाडी घातली, त्यावेळी गाडीची लाकडे गाडीवर पडल्याने काचा फुटल्या. आणि संतप्त ग्रामस्थांनी देखील गाडीच्या काचा फोडल्या. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण होते. वनविभागाने तत्परता दाखवत मुद्देमालासह चार संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. अटकेत असलेल्यांची नावे ऋतिक राठोड, राजू हिलम, रोहित चोरगे व प्रशांत जाधव ही आहेत.
परीक्षेत्र वनाधिकारी विशाल सोनावणे यांच्या नेतृत्वात आनंदराव कराडे, उत्तमराव शिंदे, संदीप ठाकरे, सुनील जाधवर, व्यंकट पवार, गुलचंद काकडे आणि अविनाश पवार यांनी या धाडसी कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास वनविभाग करत आहे.
कडक कायद्यान्वये गुन्हे दाखल
या तस्करीप्रकरणी वनक्षेत्र कार्यालय (सुधागड-पाली) येथे CR-2026 आणि C5-2026 गुन्हा क्रमांकांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ४१(ब) आणि महाराष्ट्र वन अधिनियम २०१४ च्या कलम ३१(०१) अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times