मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ठिकठिकाणी केली स्थळ पाहणी
चोवीस तासांत सरासरी सुमारे २५० मिलिमीटर पाऊस कोसळूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत, ही चांगल्या कामांची पावती
मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन झाले आहे. मुंबईतील जून महिन्यातील सरासरी पावसापैकी सुमारे ४५ टक्के पाऊस (दिनांक २४ जून २०२६) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नोंदवला गेला. सखल, अतिसखल भागांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा वेगाने करण्यात आला आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विनाअडथळा सुरु आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन समन्वयाने कार्यरत आहेत. एकूणच, जोरदार पाऊस कोसळूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत आहे, ही यंदा पावसाळापूर्व कामे चांगली झाल्याची पावती आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मुंबई महानगरात झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी (दिनांक २४ जून २०२६) सकाळपासून विविध ठिकाणी भेटी देत पाहणी केली आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. हिंदमाता लघुउदंचन केंद्र, गांधी मार्केट लघुउदंचन केंद्र, मीलन भुयारी मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, मालाड भुयारी मार्ग इत्यादी ठिकाणी महापौर तावडे यांनी भेटी दिल्या. या पाहणी दौऱ्यात के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड, पी पूर्व आणि पी पश्चिम प्रभाग समितीचे अध्यक्ष हैदर अली शेख, नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना, नगरसेवक योगेश वर्मा, नगरसेवक अॅड. सिद्धार्थ शर्मा, नगरसेविका योगिता कोळी, उपायुक्त (परिमंडळ ४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी, एफ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त वृषाली इंगळे, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पश्चिम उपनगरे) रमाकांत मोरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी ठिकठिकाणी पाहणीवेळी महापौरांनी संबंधितांना योग्य ते निर्देश दिले. मुंबई महानगरात २४ तासांच्या कालावधीत सुमारे २२५ ते २५० मिलिमीटर पाऊस कोसळला. सखल आणि अतिसखल भागातील पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी यंत्रणा अथक कार्यरत होती. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. कोठेही नागरिकांना अडचणी येवू नयेत, जनजीवन सुरळीत रहावे यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. प्रशासन समवेत समन्वय साधून नगरसेवक, नगरसेविका देखील कार्यरत आहेत.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times