शाळेत रडते म्हणून पोटच्या पोरीला केली लाथेनी मारहाण
पनवेल : नव्यानेच अंगणवाडी जाणारी अडीच वर्षाची चिमुरडी ही शाळेत रडते म्हणून रागाच्या भरात पोटच्या पोरीला लाथेने मारहाण केल्याची घटना पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरात घडली असून या संदर्भात सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त करून सदर मातेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील नांदगाव येथे ही घटना घडली आहे. शाळेत गेल्या सहा दिवसापासून ही अडीच वर्षाची चिमुरडी जात होती. परंतु शाळेमध्ये तिचे मन लागत नव्हते त्यामुळे ती सतत रडायची, अशाच प्रकारे काल सुद्धा तीची आई तिला सोडण्यास गेली असताना ती रडायला लागल्याने अंगणवाडीच्या दरवाजात तिने आपल्या मुलीला लाथेने मारले व हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याची दखल पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली व तातडीने सदर मुलीच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात आणून त्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सदर मुलीला तिच्या आईसह सध्या शासनाच्या बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे. या घटनेमुळे पालक वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
.. ती अंगणवाडी सेविका नसून पोरीची आई : मंत्री तटकरे
"सोशल मीडियावर हा व्हिडिओ 'अंगणवाडी सेविकेने मारहाण केली' असा खोटा दावा करत वेगाने पसरत आहे. महिला व बालविकास विभागाने तातडीने दखल घेत संबंधित CDPO यांना प्रत्यक्ष घटनास्थळी पाठवून चौकशी केली. चौकशीत सत्य समोर आले, ती महिला अंगणवाडी सेविका नसून त्या मुलीची आईच आहे. संबंधित महिलेने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून त्यांना लहान मुलांना मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली आहे. तसेच त्या महिलेचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे", अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तसंच, "अंगणवाडी सेविका महाराष्ट्रातील लाखो बालकांसाठी निःस्वार्थपणे झटतात, त्यांच्यावर खोट्या आरोपांचा बोजा टाकणे अन्यायकारक आहे", असंही आदिती तटकरे म्हणाल्या.
माझी मोठी चूक: पोरीची आई
"माझी मुलगी वर्गात बसायला तयार नव्हती म्हणून मी तिला मारलं. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. मी याबाबत माफी मागत असून अशी चूक पुन्हा करणार नाही. यात अंगणवाडी सेविकेची काहीही चुकी नाही", असं संबंधित मुलीच्या आईने म्हटलं आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times