पद्म पुरस्कारपासून एकटे खाशाबा वंचित – संजय दुधाणे
खाशाबांच्या संघर्षगाथेला प्रकट वाचनातून मानवंदना
पद्म पुरस्कारपासून एकटे खाशाबा वंचित – संजय दुधाणे
कराड : ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या संघर्षगाथेला टिळक हायस्कूलमध्ये प्रकट वाचनातून अनोखी मानवंदना देण्यात आली. ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या यादीत एकटे खाशाबा पद्म पुरस्कारापासून वंचित असल्याची खंत प्रकट वाचन स्पर्धेच्या बक्षिस समारंभात लेखक संजय दुधाणे यांनी व्यक्त केली.
भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव संजय दुधाणे लिखित चरित्र वाचन स्पर्धा कराडमधील टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी लेखक आपल्या शाळेत हा उपक्रमही राबविण्यात आला. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्र पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे यांच्या हस्ते वाचन स्पर्धेतील विद्यार्थींला बक्षिस देण्यात आले. याप्रसंगी आकाशवाणीच्या निवेदिका सीमा मकोटे, शाळेचे उपमुख्याध्यापक पंडित मोरे, पर्यवेक्षिका सौ वैशाली भोपळे, कार्याध्यक्ष वैभव सावंत व शिक्षक उपस्थित होते.
प्रकट वाचन स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी खाशाबा जाधव यांच्या संघर्षमय जीवनाचा अभ्यास केला. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि अडथळ्यांवर मात करत त्यांनी ऑलिम्पिक पदकापर्यंत केलेला प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक-एक रुपया जमा करून समाजाने केलेली मदत आणि त्यामागील प्रेरणादायी कथेचे स्मरण विद्यार्थ्यांनी करून खाशाबांना मानवदंना दिली. इयत्ता ६ ते १० पर्यंतच्या विद्यार्थींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान लेखक संजय दुधाणे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व "ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव" हे चरित्रग्रंथ देऊन करण्यात आला. मुख्याध्यापक एस. एस. शिंदे यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लेखक संजय दुधाणे यांनी या चरित्रग्रंथाच्या निर्मितीपासून गेल्या पंधरा वर्षांतील संशोधन आणि लेखन प्रवासातील विविध अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. "जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचा संघर्ष प्रत्येकाने कायम डोळ्यांसमोर ठेवावा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी," असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र शासनाने खाशाबानंतर ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सर्व विजेत्यांना पद्म पुरस्काराने गौरवित केले आहे. यामध्ये आद्य पदक विजेते खाशबा वंचित असून त्यांना पद्मविभूषण पुरस्कार यंदा जाहिर होईल हीच साऱ्या महाराष्ट्राची अपेक्षा असल्याचे संजय दुधाणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble