समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे सत्र सुरुच चिमुकलीसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत
अमरावती : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताने पाच जणांचा बळी घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूरहून मुंबईकडे निघालेली बॅगनआर कार भरधाव ट्रकच्या मागे आदळल्याने हा भीषण अपघात झाला. घड़केची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा अक्षरशः चुराडा इाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन बचाव पडकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघात धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चैनल क्रमांक १०५ जवळ घडल्याचे सांगण्यात आले.
प्रवाशांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन
समृद्धीमहामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमालीचा वाचत असल्याने नागरिक या मार्गाचा सर्रास वापर करतात. मात्र, या सरळ आणि मोकळ्या महामागाँवर चाहनांचा वेग अनियंत्रित झाल्याने आतापर्यंत अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
मृतांची नावे
आरती जीवने (४०), भास्कर जीवने (५७), महादेव जीवने (४२), लता जीवने (४३) आणि प्रिशा जीवने (१२) (सर्व रा. डी.एड. कॉलेजजवळ, बाबुपेठ, चंद्रपूर)
समृद्धी महामार्गावरून (प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि नातेवाईकांवर शोकाकळा पसरली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसताच वॅगनर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची किंवा सावरण्याची साधी संधीही मिळाली नाही. या दुर्घटनेत कारमध्ये सवार असलेल्या पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान चिमुकलीचा समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि महामार्ग सुरक्षा यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना वाचवून रुग्णालयात दाखल करण्यासाठी तारकाळ मदतकार्य सुरू करण्यात आले. परंतु, धडक इतकी भीषण होती की मदत मिळेपर्यंत पावही जणांची प्राण ज्योत मालवली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जवळच्या सासकीय रुग्णालयात पाठवले असून, पुढील तपास सुरू केला आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times