टीईटी परीक्षार्थींमध्ये तीव्र संताप व नाराजी पेपरफुटीच्या संशयामुळे टीईटी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली
पाली :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (दि. २८) संपूर्ण राज्यात घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. परिणामी परीक्षार्थी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व नाराजी आहे. भिवंडी येथे परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या २४ तास आधी प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय आल्याने आणि पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने परीक्षा परिषदेने हा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहीर प्रगटन परीक्षा परिषदेचे आयुक्त यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २७) पहाटेच्या सुमारास भिवंडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही इसमांकडे आगामी TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील माहिती आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी धाड टाकली. यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून पडताळणी केली असता, संशयितांकडे सापडलेले प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. या गंभीर प्रकारानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
परीक्षा पूर्ण पारदर्शकतेने व्हावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी २८ जून रोजी १०२८ केंद्रांवर होणारी ही परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
हे अतिशय चुकीचे झाले आहे. पैशांसाठी काही लोक काही पण करतील. आम्ही दोन महिने त्रास घेऊन दिवस-रात्र अभ्यास करून शेवटी पदरी निराशाच आली. आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना या भ्रष्ट यंत्रणेमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
संध्या कासारे, परीक्षार्थी, श्रीवर्धन
परीक्षार्थींचा संताप
"पैशांसाठी काही पण करतील..."
ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा रद्द झाल्याने लाखो उमेदवारांच्या स्वप्नांवर आणि कष्टांवर पाणी फेरले गेले आहे. परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची तयारी करत असलेल्या उमेदवारांमध्ये या निर्णयामुळे प्रचंड संताप आणि निराशा पाहायला मिळत आहे. NEET परीक्षेतील गैरप्रकार ताजा असतानाच आता राज्यातील TET परीक्षेबाबतही हेच घडल्याने विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
"केवळ परीक्षा पुढे ढकलणे हा उपाय नाही. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. सरकारने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शिक्षण क्षेत्राची बदनामी करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींना कठोर शिक्षा केली पाहिजे, अशी मागणी शिक्षक प्रतिनिधींकडून होत आहे.संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times