राज्यात पावसाचा कहर मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण भागात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सखल भागांत २ ते ३ फूट पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, अंधेरी आणि गोरेगाव परिसरात तुफान पाऊस पडला. अंधेरी सबवे अडीच फुट पाण्याखाली गेला. वीरा देसाई रोड, फिल्म सिटी रोड, संतोषनगर आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी भागात २-३ फूट पाणी साचल्याने वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली. वरळी आणि चेंबूरमधील अनेक सखल भागांत पाणी घुसले.
संध्याकाळी घरी परतणाऱ्या लाखो मुंबईकरांना पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर ते ठाणे दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, वसई-विरारमध्ये वाधराळ पाड्यात ३ दुचाकी आणि २ कार वाहून गेल्या. सुदैवाने एका कार चालकाने उडी मारून आपला जीव वाचवला, नालासोपारा, कल्याण आणि ठाण्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. ठाणे महापालिका क्षेत्रात ८ तासांत ८२.७६ मिमी पावसाची नोंद झाली.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times