रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत पर्जन्यजल व्यवस्थापनासाठी 681 शोष खड्ड्यांची निर्मिती पूर्ण
मुंबई : खड्डेमुक्त रस्ते उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेने रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. कॉक्रिटीकरण टप्पा 1 आणि टप्पा 2 अंतर्गत नियोजित 700 किलोमीटर रस्त्यांपैकी आजपर्यंत 576 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, प्रकल्पाने सुमारे 81 टक्के लक्ष्यपूर्ती साध्य केली आहे. कॉक्रिटीकरण प्रकल्पाचा अविभाज्य घटक म्हणून पर्जन्यजलाचे प्रभावी व्यवस्थापन आणि भूजल पुनर्भरणाला चालना देण्यासाठी शोष खड्डूघांची उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये मिळून आतापर्यंत एकूण 681 शोष खड्धांची निर्मिती पूर्ण करण्यात आली आहे. या शोष खड्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार असून अलनिस्सारण यंत्रणेवरील ताण कमी होण्यास देखील हातभार लागणार आहे.
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक, सुरक्षित व सुयोग्य स्वरूप देण्याच्या दृष्टिने रस्ते कॉक्रिटीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील प्रमुख आणि दुय्यम मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत, वेगवान व शिस्तबद्ध होण्यास मदत होत असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात लक्षणीय सुधारणा झाली आहे. आजपर्यंत 576 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून हे सर्व रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत. निर्धारित कालमर्यादेत, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करुन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व्यापक नियोजन करुन सिमेंट
काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे रस्ते प्रवास अधिक सुकर होत आहे. काँक्रिट रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परिरक्षणाचा खर्च देखील कमी झाला आहे. तसेच, कीक्रिट रस्ते दीर्घकाळ टिकतात. सबब, मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त सस्ते उपलब्ध होत आहेत.
शोषखड्डे कसे तयार करतात
१ सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामामध्ये रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी जलदगतीने जमिनीत मुरावे, भूजल पुनर्भरण (Ground Water Recharge) व्हावे तसेच सत्याच्या पृष्ठभागावर पाणी साचून सत्याचे नुकसान होऊ नये या उद्देशाने आवश्यक त्या ठिकाणी शोषखड्डे तयार करण्यात येतात. शोषखनुधासाठी प्रथम निवडलेल्या जागेवर साधारणता 100 ते 150 मीटर व्यासाचा (गोलाकार) किंवा 100 x 100 मीटर ते 150 x 150 मीटर (चौकोनी। आकाराचा आणि 1.50 ते 300 मीटर खोलीचा खड्डा खोदला जातो. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर खहुधाचा तळ काँक्रीट न करता नैसर्गिक मातीवरच ठेवला जातो, जेणेकरून पाणी जमिनीत सहज झिरपू शकेल.
यानंतर खङ्घयाच्या तळाशी सुमारे 300 ते 450 मि.मी. जाडीचा 40 ते 60 मि मी. आकाराच्या मोठ्या खडीचा थर टाकला जातो. त्यावर 20 ते 40 मि.मी. आकाराची खड़ी आणि शेवटी 6 ते 20 मि.मी. आकाराची बड़ी किंवा जाड वाळूचा थर भरला जातो. या थरांमुळे पाण्याचे गाळण (Filtration) होऊन ते हळूहळू जमिनीत मुरते. खड्याच्या बाजूस हनीकॉम्ब विटांचे बांधकाम किंवा छिद्रे असलेले आरसीसी रिंग बसवले जातात, ज्यामुळे बाजूनेही पाणी जमिनीत झिरपते आणि शोषण क्षमता वाढते.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times