ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत ‘सीकेटी’चा दबदबा

‘कीचकवध पुन्हा’ मुंबई विभागात प्रथम; राज्य नाट्य स्पर्धेतही पनवेलच्या कलाकारांची चमक

मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते गौरव; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

पनवेल (प्रतिनिधी)  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाने उल्लेखनीय यश मिळवत मुंबई विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या ‘कीचकवध पुन्हा’ या एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा मान मिळाल्याने संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

        या एकांकिकेने केवळ सांघिक प्रथम क्रमांकच मिळवला नाही, तर विविध वैयक्तिक विभागांतही सीकेटीच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. प्रणव शेडगे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार मिळाला, तर अखिलेश, सुशांत, पीयूष आणि भूमी यांच्या संगीत संयोजनाला सर्वोत्कृष्ट संगीताचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनामिका कांबळे यांनी सर्वोत्कृष्ट वेशभूषा, तर दिक्षिता पाटील यांनी सर्वोत्कृष्ट रंगभूषेचा प्रथम पुरस्कार पटकावला. या सर्व विजेत्यांचा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


      याचबरोबर, ६४व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या ठाणे विभागीय प्राथमिक फेरीत पनवेलच्या कलाकारांनीही आपल्या अभिनय आणि तांत्रिक कौशल्याची प्रभावी छाप पाडली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘नारायणी’ या दोन अंकी नाटकाला विविध विभागांत मानाची पारितोषिके मिळाली. अभिनय विभागात सानिका पाटील यांनी सर्वोत्कृष्ट स्त्री भूमिका, तर क्षितिज गायकवाड यांनी सर्वोत्कृष्ट पुरुष भूमिकेचा पुरस्कार पटकावला. तांत्रिक विभागात श्याम चव्हाण यांना सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठी प्रथम क्रमांक, रितूपर्ण कीर्तोनिया यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि वेशभूषेसाठी द्वितीय क्रमांक, गणेश जगताप यांना सर्वोत्कृष्ट संगीतासाठी द्वितीय क्रमांक, तर रितूपर्ण कीर्तोनिया, रोहित देशमुख आणि आर्यन अन्सारी यांना सर्वोत्कृष्ट नेपथ्यासाठी तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. एकांकिका आणि राज्य नाट्य स्पर्धा अशा दोन्ही प्रतिष्ठेच्या व्यासपीठांवर पनवेलच्या विद्यार्थ्यांनी आणि कलाकारांनी मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व विजेते कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी कलाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे पनवेलच्या सांस्कृतिक परंपरेला आणखी बळ मिळाले आहे. .

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट