टनकपूर - पिलीभीत रेल्वे सेवेचा शाहजहानपूरपर्यंत विस्तार
नांदेड - मुंबई व टनकपूर - नांदेड दरम्यान दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा
नांदेड : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड-मुंबई व टनकपूर-नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला, तसेच टनकपूर-पिलीभीत रेल्वे सेवेचा शाहजहानपूरपर्यंत विस्तारही करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, टनकपूर-नांदेड एक्सप्रेसची सुरुवात ही जनतेच्या दीर्घकाळापासूनच्या अपेक्षांची पूर्तता आहे. ही नवीन रेल्वे सेवा उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करेल तसेच नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी सुविधा ठरेल. त्यांनी पुढे सांगितले की, नांदेड-मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाडा परिसरातील, विशेषतः वाशीम, हिंगोली आणि बसमत येथील प्रवाशांना मुंबईशी अधिक सुलभरेल्वे संपर्क उपलब्ध होईल.
या निमित्ताने नांदेड, टनकपूर आणि पिलीभीत रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. टनकपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री स्वनीत सिंह, अजय टम्टा तसेच इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पिलीभीत येथे केंद्रीय राज्यमंत्री जितीन प्रसाद व इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचवेळी नांदेड रेल्वे स्थानकावर खासदार अशोकराव शंकरराव चव्हाण, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ. कविता संतोष मुळे, खासदार मा. डॉ. अजित माधवराव गोपछडे, खासदार मा. श्री. रवींद्र वसंतराव चव्हाण, खासदार मा. बळवंत बसवंत वानखेडे, विधान परिषदेचे सदस्य अमरनाथ अनंतराव राजूरकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. संजय कुमार श्रीवास्तव, नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले तसेच इतर रेल्वे अधिकारीही या कार्यक्रमास उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times