मुंबई महानगरात गेल्या दोन दिवसांत शहर विभागात 300 मिलीमीटर पावसाची नोंद
पूर्व उपनगरात ३८० मिलीमीटर, पश्चिम उपनगरात ३४५ मिलीमीटर पावसाची नोंद अतिवृष्टी आणि ताशी ७७ किमी वेगाच्या वाऱ्यांमध्येही महानगरपालिकेचा तत्पर प्रतिसाद
मुंबईः मुंबई महानगरात गेल्या तीन दिवसांपासून अति मुसळधार पाऊस सातत्याने कोसळत असून गेल्या ४८ तासांत शहर विभागात ३०० मिलीमीटर, पूर्व उपनगरात ३८० मिलीमीटर तर पश्चिम उपनगरांत ३४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या विक्रमी पर्जन्यामुळे आणि ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत परिस्थितीवर चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
झाडे व फांद्या कोसळगे, शॉर्टसर्किट, धोकादायक इमारतींचे अंशतः किंवा पूर्णतः भाग कोसळणे तसेच इतर आपत्कालीन घटनांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. सखल भागांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेचे उदंचन पंप, डी-बॉटरिंग यंत्रणा आणि अतिरिक्त मनुष्यबळ सातत्याने कार्यरत आहे. तसेच बचाच साहित्य, यंत्रसामग्री आणि आवश्यक संसाधने पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांकडून समन्वित आणि वेगवान कार्यवाही मुरु आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMID) बृहन्मुंबई क्षेत्रासाठी शनिवार (दि. ४ जुलै), रबिबार (दि. ५ जुलै) आणि
सोमबार (दि. ६ जुलै २०२६) या सलग तीन दिवसांसाठी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा जारी केला होता. मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि जोरदार बादळी चाऱ्यांचा इशमा लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवली होती. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सलग तीनही दिवस
महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवत
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मंगळवार, दिनांक ७जुलै २०२६ रोजी अति जोरदार पावसाचा इशारा (Orange Alert) दिला आहे. तसेच, सोसाट्याचा वारा बाहेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्या, मुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी (अरीज्ञ) करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times