मानखुर्दमध्ये घर कोसळून ५ बालकांसह ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
महापौर श्रीमती रितू तावडे यांनी गोवंडी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांचे केले सांत्वन
मुंबईः मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात आज रविवार दिनांक ५ जुलै २०२६ रोजी रात्री ०८.३० वाजता अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या तीन मजली कच्च्या चाळीतील २ ते ३ घरे अचानक कोसळली, या दुर्घटनेत ५ लहान मुले आणि एक स्त्री अशा एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात जावून मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करून धीर दिला. यावेळी आमदार श्री. अबू असीम आझमी, श्रीमती रुक्साना सिद्दिकी हेही उपस्थित होते. प्रथमदर्शनी प्राप्त माहितीनुसार, रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी रात्री साधारण साडेआठ वाजेच्या सुमारास मानखुर्द मध्ये हनुमान मंदिराजवळील, जनता नगर मधील चाळ क्रमांक ५ मधील तळमजला अधिक तीन मजले
असलेल्या २ ते ३ झोपड्या /कच्ची घरे कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली रहिवासी अडकले. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिकेचे विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये रवाना करण्यात आले.
स्थानिक नगरसेवक श्री. नवनाथ बन हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचे समन्वयन करीत आहेत. या दुर्घटनेतील बाधितांना गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर स्थित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात दाखल एक महिला, ३ लहान मुली आणि एक लहान मुलगा अशा पाचही जणांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. तसेच, राजावाडी रुग्णालयात एक लहान मुलगा मृतावस्थेत आणण्यात आला आणि एक तरुण जखमी अवस्थेत दाखल झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी महापौरांना दिली
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times