सर्पदंश उपचारासाठी पालघर जिल्हा आरोग्य विभाग सज्ज
सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ASV इंजेक्शनचा पुरेसा साठा; १०८ रुग्णवाहिका सेवाही सतर्क
पालघर :- पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागाने संपूर्ण जिल्ह्यात विशेष तयारी केली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच इतर शासकीय आरोग्य संस्थांमध्ये अँटी स्नेक व्हेनम (ASV) इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला असून सर्पदंश झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सर्पदंशाच्या रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. गंभीर रुग्णांना विलंब न करता उच्चस्तरीय आरोग्य संस्थेत दाखल करण्यासाठी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा तसेच इतर शासकीय रुग्णवाहिका चोवीस तास कार्यरत ठेवण्यात आल्या असून त्या स्वच्छ, सुसज्ज आणि तत्पर स्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सर्पदंश झाल्यास कोणत्याही प्रकारचे घरगुती उपचार, झाडफूक, मांत्रिक किंवा अंधश्रद्धेचा अवलंब न करता रुग्णाला तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत दाखल करावे. सर्पदंशानंतर वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार आणि ASV इंजेक्शन मिळाल्यास मृत्यू तसेच गंभीर गुंतागुंत टाळणे शक्य होते.
पावसाळ्यात सर्पदंशाच्या संभाव्य घटनांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा किंवा जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times